Friday, April 26, 2024
Homeनगरआत्मनिर्भर भारत अभियान विकासाचे नवे पर्व मिळवून देईल- आ. विखे

आत्मनिर्भर भारत अभियान विकासाचे नवे पर्व मिळवून देईल- आ. विखे

शिर्डी (प्रतिनिधी)– करोना संकटातून देशाला सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेले आत्मनिर्भर भारत अभियान आमआदमीसह देशाला विकासाचे नवे पर्व मिळवून देईल, असा विश्वास माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना जाहीर केलेल्या आत्मनिर्भर अभियानासंदर्भात प्रतिक्रीया व्यक्त करताना आ. विखे पाटील म्हणाले की, देशाच्या स्वावलंबनासाठी आणि आर्थिक विकासासाठी 20 लाख कोटी रुपयांचे जाहीर केलेले पॅकेज हे अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे. कोव्हिड संकटामुळे देशातील सर्व क्षेत्र अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी शेतमजूर, कामगार, मध्यमवर्गीय कर्मचारी, रोजंदारीवरील मजूर, छोटे व्यावसायीक लघु उद्योजक अशा सर्वांसाठीच दिलासा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

करोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी देशातील जनतेला निर्धाराने सामोरे जाण्याबाबत आवाहन केले होते. संकटाच्या प्रत्येक पायरीवर सामान्य माणसाला नवा आत्मविश्वास देऊन या संकटातून पुन्हा सामर्थ्यांने उभे राहण्याचा संकल्प मांडला. या आपत्तीच्या प्रसंगात वेळावेळी घेतलेल्या निर्णयांमुळेच देश सावरला गेला. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगाच्या पाठीवर सिध्द झाले.

भारतामध्ये असलेल्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाचा तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून उत्पादन क्षमता वाढविण्याबरोबरच देशांतर्गत बाजारपेठेचे महत्त्व आधोरेखीत करून पंतप्रधानांनी आत्मनिर्भर अभियानातून देशातील जनतेला नवा विश्वास आणि देशाच्या विकासात्मक वाटचालीला प्रोत्साहनच दिले असल्याचे मत आ.विखे पाटील यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या