Thursday, April 25, 2024
Homeनगरकृषी विभागाने मॉडेल व्हीलेजची संकल्पना राबवावी

कृषी विभागाने मॉडेल व्हीलेजची संकल्पना राबवावी

खरिप हंगाम आढावा बैठकीत आमदार विखे पाटील यांची सूचना

शिर्डी (प्रतिनिधी)- फळबागा आणि भाजीपाल्याचे उत्पादन क्षेत्र निश्चित करताना फार्मर्स प्रोड़युसर कंपन्यांच्या सहकार्याने मार्केटिंगच्या नियोजनासाठी कृषी विभागाने मॉडेल व्हिलेजची संकल्पना राबवावी, अशा सूचना माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत दिल्या.

- Advertisement -

कृषि विभागाच्यावतीने आगामी खरीप हंगाम पूर्वतयारीच्यादृष्टीने आयोजित आढावा बैठकीत आ. विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी करोना संकटाच्या काळात शेतकर्‍यांसमोर निर्माण झालेल्या मार्केटिंगच्या प्रश्नाचे गांभीर्य अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले.

प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसिलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, सभापती बापूसाहेब आहेर, गणेशचे चेअरमन मुंकूदराव सदाफळ सभापती मंदाताई तांबे, उपसभापती उमेश जपे आदी उपस्थित होते.

आ. विखे पाटील यांनी सांगितले की, केवळ खरीप हंगाम म्हणून नव्हे तर तालुक्यात असलेले ऊसाचे क्षेत्र गृहीत धरून युरीया खताची मागणी नोंदविण्याचे सूचित केले. पीक विमा योजनेची आकडेवारी पाहिली तर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने विम्याची रक्कम भरत असले तरी या शेतकर्‍यांना लाभ मिळत नाही हे स्पष्टपणे दिसते. यामध्ये कंपन्यांऐवजी शेतकर्‍यांचा लाभ कसा होईल हा विचार अधिकार्‍यांनी करावा, अशी सुचना करतानाच शेतकर्‍यांसाठी विविध योजना आहेत. परंतु वेळेच्या मर्यादेत प्रस्ताव जात नसल्यामुळे शेतकरी या योजनेस पात्र होत नाहीत. यासाठी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि वेळेत करावी, असे त्यांनी कृषि सहाय्यकांना सांगितले.

फार्मर्स ग्रुप, निर्यातदार शेतकरी, सेंद्रीय शेती, पॉलिहॉऊस असणारे शेतकरी यांची माहीती गावनिहाय तयार झाली तर मॉडेल व्हिलेजची संकल्पना यशस्वी होवू शकेल. कोरोनाच्या संकटामुळे सर्वच शेतकर्‍यांसमोर उत्पादीत माल्याच्या विक्रीचे मोठे आव्हान उभे राहीले, शेतक-यांना माल फेकून द्यावा लागला हा अनुभव लक्षात घेवून उत्पादनाबरोबच विक्री व्यवस्था सक्षम करण्यासाठी तालुका पातळीवरच आता कृषि विभागाला काम करावे लागेल. यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बाजास समिती यांच्या सहकार्याने कृषि व्यवसायाचा कृती आराखडा तयार करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. उपविभागीय कृषि आधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषि आधिकारी श्री.शिंदे यांनी या बैठकीत माहीती सादर केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या