आ. रोहित पवार यांच्या जनता दरबारामध्ये तक्रारींचा पाऊस
Featured

आ. रोहित पवार यांच्या जनता दरबारामध्ये तक्रारींचा पाऊस

Sarvmat Digital

प्रचंड प्रश्न पाहून जनता दरबार संपूर्ण आढावा न घेता संपवावा लागला

कर्जत (वार्ताहर)- आमदार रोहित पवार यांच्या कर्जत येथील जनता दरबारामध्ये नागरिकांचा तक्रारींचा पाऊस पाडला. साडेतीन तासामध्ये अवघ्या तीन विभागाचा आढावा घेता आला नागरिकांचे प्रचंड स्वरूपातील प्रश्न पाहून अखेर संपूर्ण आढावा न घेताच जनता दरबार संपवावा लागला यानंतर पुन्हा उर्वरीत प्रश्नाबाबत जनता दरबार घेणार असल्याचे आमदार रोहीत पवार यांनी सांगितले.

कर्जत येथील शिवर्पावती मंगल कार्यालयामध्ये आज आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या जिल्हापरीषद, महावितरण, सी. एम. जस वाय, पशूसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग या विभागाच्या संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचेमोहिते, प्रभारी कार्यकारी आभियंता अशोक भोसले, महावितरणचे श्री. सांगळे, श्री. मासाळ, मुख्य ग्रामसडकचे श्री. पेशवे व श्री. दिलवाले, तहसीलदार छगन वाघ गटविकास अधिकारी अमोल जाधव वनविभागाचे श्री. साबळे, श्री. छब्बीलवाड, जिल्हापरिषदेचे कार्यकारी आभियंता श्री. गावडे, श्री. कनगुडे, श्री. पवार, पशुसंवर्धनचे डॉ. चैरे, विस्तार अधिकारी परमेश्वर सुद्रिक, रूपचंद जगताप, गटशिक्षण अधिकारी मिना शिवगुंडे यांचेसह सर्व विभागाचे तालुका स्तरीय अधिकारी व कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी विविध गावचे सरंपच शेतकरी नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी नागरिकांनी जिल्हापरीषद, सर एम. जेएस. वाय बाधकाम विभाग यांचे सह सर्वच रस्ते, त्यांचा दर्जा, रेगांळलेली कामे याबाबत तक्रारी केल्या. महावितरण कंपनीचे कनेक्शन, डीपी, पशुवैद्यकीय दवाखाने व वैद्यकीय अधिकारी याबाबत सूचना मांडल्या. वनविभागाच्या काही रस्ते आणि इतर तक्रारी मांडल्या.

जनता संवादाचा शब्द दिला होता
मी निवडणुकीपूर्वी नागरिकांना सर्व विभागाचे अधिकारी यांना बोलावून त्यांच्या समस्या सोडविण्साठी जनता संवाद दरबार भरवेल असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे आज काही विभागाचा आढावा झाला आहे. उर्वरीत विभागाचा पण लवकर घेऊ यावेळी नागरिकांनी प्रामुख्याने रस्ते व त्यांचा दर्जा याबाबत अनेक अडचणी मांडल्या आहेत. यामध्ये रस्ते चांगले व दर्जेदार व्हावेत हा हेतू आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत. असेच वातावरण भविष्यात मतदार संघात राहिल्यास जनतेच्या प्रत्येक पैशाचा हिशोब आपण त्यांना देऊ. अधिकारी आणि जनता यांच्यामधील दुरावा कमी करू चांगल्या कामाचे कौतुक करू आणि भविष्यात आणत असलेल्या निधीचा योग्य विनयोग होईल. यामध्ये मी किंवा माझी माणसे कोणतीही टक्केवारी मागत नाही, मागणार नाही व कोणी मागितली तर मला सांगा असे खुले आवाहन रोहित पवार यांनी केले.

राम शिंदे यांचेवर नाव न घेता टिका
रोहीत पवार म्हणाले की, महावितरण कंपनीसाठी केंद्र सरकारची शेतकरी आणि नागरिक यांच्यासाठी मोठी योजना होती. मात्र राम शिंदे यांनी लक्ष दिले नाही. यामुळे शेतकरी व नागरिक मोठ्या प्रमाणात वंचित राहिले. आता केंद्र सरकारने योजना बंद केली आहे, मात्र तरीही राज्यसरकारच्या माध्यमातून आपण 2800 पैकी 2000 लोकांना वीज कनेक्शन दिले आहे. डीपीची कामे व इतर कामे करण्यासाठी राज्यसरकार आणि पालकमंत्री यांच्यामाध्यमातून निधी उभा करून कामे करू असे जाहीर केले.

Deshdoot
www.deshdoot.com