Thursday, April 25, 2024
Homeनगरआमदार मोनिका राजळे धडकल्या मुळा कालच्याच्या लाल गेटवर !

आमदार मोनिका राजळे धडकल्या मुळा कालच्याच्या लाल गेटवर !

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – आपल्या मतदार संघातील शेतकर्‍यांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी आज थेट नेवासा तालुक्यातील देडगाव जवळील मुळा उजव्या कालव्याच्या लाल गेटवर धडक मारुन कालव्यातील पाणी पातळीची प्रत्यक्ष पाहणी केली.

मुळा धरणातून मुळा उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन 20 मार्च पासून सुरू झालेले आहे.मुळा उजव्या कालव्यातून ब्रँच 2 मधून शेवगाव व पाथर्डी तालुक्याला पाटपाणी जाते.परंतु महिना झाला तरी नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील टेलच्या शेतकर्‍यांचे भरणे पूर्ण निघालेले नाही. त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघातील सर्व शेतकर्‍यांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व आमदार मोनिका राजळे या तिघांचे मतदारसंघातील शेतकर्‍यांना उजव्या कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळतो. त्यामुळे आपल्याच भागाला प्रथम पाणी मिळावे असे प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटत असते.

- Advertisement -

त्याचाच एक भाग म्हणून पाथर्डी ब्रँचला पूर्ण दाबाने पाणी मिळून सर्वांचे भरणे निघावे यासाठी बुधवार दि. 21 एप्रिल रोजी दुपारी भर उन्हात शेवगाव-पाथर्डीच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनी नेवासा तालुक्यातील देडगाव परिसरात जेथे नेवासा तालुक्याकडे जाणारी ब्रँच 1 व पाथर्डी तालुक्याकडे जाणारी ब्रँच 2 असे दोन कालवे सुरू होतात अशा लालगेटची व जेथून पाथर्डी ब्रँच सुरू होते त्या ठिकाणाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व माहिती घेतली.

मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी आमदार मोनिका राजळे यांना माहिती दिली. उपअभियंता बाळासाहेब भापकर, प्रविण दहातोंडे, शाखा अभियंता स्वप्निल देशमुख, पद्मसिंह तनपुरे,संदीप शेळके हे अधिकारी उपस्थित होते.

भातकुडगाव मधील शेतकर्‍यांच्या तक्रारींची दखल
मागील काही दिवसांपासून शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील शेतकर्‍यांची पाट पाणी मिळत नसल्याची ओरड होती.त्या पार्श्वभूमीवर आमदार मोनिका राजळे यांनी आज सकाळी भातकुडगाव येथे जाऊन शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी थेट नेवासा तालुक्यातील लाल गेट गाठले. त्याच ठिकाणी अधिकार्‍यांना बोलावून लालगेटवरच मिटिंग घेऊन पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या