श्रीगोंदयात जुगाऱ्यांवर गायब मुद्देमाल भारी : उलट सुलट चर्चा
Featured

श्रीगोंदयात जुगाऱ्यांवर गायब मुद्देमाल भारी : उलट सुलट चर्चा

Sarvmat Digital

श्रीगोंदा (प्रतिनिधी) –  शहरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी जुगार खेळत असलेल्या ठिकाणी २० मे रोजी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला यात एक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा तर दुसरी कारवाई श्रीगोंदा पोलिसांनी केली. यात एक ठिकाणी नऊ तर दुसऱ्या ठिकाणी ही नऊ व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र जप्त मुद्देमालात रोख रक्कम जी दाखवली ती आणि प्रत्यक्षात या खेळगड्यांच्याकडे असलेल्या रक्कम यात तफावत असल्याने या गायब मुद्देमालाची चर्चा गावभर होती. विशेष म्हणजे या खेळगड्यांनी सकाळी पुन्हा पोलीस स्टेशन गाठत फिर्याद आणि जप्त मुद्देमाल यातली रोख रक्कम कशी कमी झाली, यासाठी पोलीस स्टेशन गाठले होते.

दि. २० रोजी शहरात असलेल्या सृष्टी हॉटेल च्या बाजूला जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली त्यांनी या ठिकाणी छापा घातला तिथे सहा जण ताब्यात घेतले उर्वरित चार जण फरार दाखवण्यात आले .गुन्हा ही दाखल केला .मात्र जप्त केलेल्या मुद्देमाल यात वस्तू दाखवण्यात आल्या मात्र रोख रक्कम फिर्यादी मध्ये दाखवण्यात आली त्यापेक्षा अधिक असल्याची चर्चा होती .तर दुसऱ्या एका हॉटेल वर देखील जुगाराचे ठिकाणी छापा टाकला इथेही नऊ जनांच्या वर कारवाई करत गुन्हा दाखल केला मात्र जप्त केलेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात दाखवली रक्कम यात तफावत असल्याचे खेळनारे सांगत होते .

Deshdoot
www.deshdoot.com