Friday, April 26, 2024
Homeनगरएमआयडीसीमधील कारखान्यांत 50 टक्केच कर्मचारी कामावर ठेवा

एमआयडीसीमधील कारखान्यांत 50 टक्केच कर्मचारी कामावर ठेवा

जिल्हा प्रशासनाचे आदेश : कारखाने पूर्णपणे बंद ठेवण्याची डॉ. पवार यांची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व आस्थापानासह गर्दी होणार्‍या सर्व ठिकाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात सरकारी कार्यालय, निमसरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचारी कामावर ठेवण्याचे सरकारचे आदेश असून हे आदेश एमआयडीसीमधील कारखान्यांना लागू राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, एमआयडीसी मधील कारखानदार करोनो संदर्भात गाफील दिसत आहेत. या आजाराच्या नियंत्रणासाठी कुठल्याही उपाययोजना करताना दिसून येत नाहीत. शाळा, महाविद्यालय मॉल जसे बंद करण्यात आले, तसे काही कालावधीसाठी एमआयडीसी येथील कारखाने बंद ठेवण्यात यावेत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार यानी जिल्हाधिकारी यांना दिले.

गुरूवारी कोरोनाचा दुसरा बाधीत समोर आल्यावर जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेत, जिल्ह्यातील सर्व खासगी ठिकाणी ज्या ठिकाणी गर्दी होते, सरकारी आणि सामाजिक कार्यक्रमापासून ते प्रार्थना कार्यक्रमावर 31 मार्चपर्यंत बंदी घातली आहे. यामुळे नागरिकांना आता पुढील काही दिवस घरात राहवे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली असता. राज्य सरकारकडून याबाबत काहीही निर्देश आलेले नाहीत. मात्र, तुर्तास सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे एमआयडीसीमधील कारखान्यांत 50 टक्के कामागारांची उपस्थिती ठेवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

दुसरीकडे पंचायात समिती सदस्य डॉ. पवार यांनी करोनो हा संसर्ग जन्य आजार आहे. प्रशासनाने गर्दी होऊ नये यासाठी चांगलीच खबरदारी घेतली आहे. मात्र एमआयडीसी मधील कारखानदार या बाबत उदासीन दिसून येत आहे. एमआयडीसीमध्ये कामगारांची संख्या माठ्या प्रमाणात आहे. तसेच कंपनीमध्ये येणार्‍या मालाची वाहतूक पुणे, मुंबई, औरंगाबाद बरोबर परराज्यातून होत आहे. या वाहतूक करणार्‍या चालकांचा संपर्क बर्‍याच ठिकाणी होत असतो. तसेच परराज्यांतून कामासाठी येणार्‍या कामगारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. खबरदारी म्हणून येथील कारखाने काही कालावधी साठी बंद करण्यात यावे या बाबतचे निवेदन पवार यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या