मराठी नाट्य परिषदेच्या शाखाध्यक्षपदी पुन्हा खोले
Featured

मराठी नाट्य परिषदेच्या शाखाध्यक्षपदी पुन्हा खोले

Sarvmat Digital

प्रमुख कार्यवाह लोटके तर उपाध्यक्षपदी नजान, शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी नाटय परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा अमोल खोले यांच्या गळ्यात पडली आहे. प्रमुख कार्यवाहपदी सतीश लोटके तर उपाध्यक्षपदी शशिकांत नजान व श्याम शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नाट्य परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 19 उमेदवार बिनविरोध निवडण्यात आले. बुधवारी (दि.4) झालेल्या बैठकीत अखिल भारतीय मराठी नाटय परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी अमोल खोले यांची तसेच प्रमुख कार्यवाह सतीश लोटके तर उपाध्यक्ष पदी शशिकांत नाजान, श्याम शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

शंभराव्या नाटय संमेलनाच्या दृष्टीने सर्वसमावेशक अशी पदाधिकारी आणि कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे, असे अध्यक्ष अमोल खोले यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नाट्य कलाकार, जेष्ठ रंगकर्मी या सर्वांना बरोबर घेऊन यापुढील काळात कार्य केले जाणार असून हौशी रंगभूमीच्या विकासाच्या दृष्टीने विविध योजना राबविल्या जाणार असल्याचे उपाध्यक्ष शशिकांत नजान यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कला आणि कलाकार, लोककला, संगीत, नृत्य तसेच बालरंगभूमी अधिक सशक्त करण्यासाठी नाटय परिषद प्रयत्नशील असून शंभराव्या नाटय संमेलनात भरीव, दर्जेदार आणि सर्वोत्तम कार्यक्रम नगरकर प्रेक्षकांना पहावयास मिळणार असून नगरच्या मातीतील कलाकारांच्या कलागुणांना या व्यासपीठावर संधी दिली जाणार आहे, असे प्रमुख कार्यवाह सतीश लोटके यांनी सांगितले.

नवीन कार्यकारणी
अध्यक्ष – अमोल खोले, उपाध्यक्ष – शशिकांत नजान व श्याम शिंदे, प्रमुख कार्यवाह – सतीश लोटके, कोषाध्यक्ष – तुषार चोरडिया, कार्याध्यक्ष – सतीश शिगंटे, सहकार्याध्यक्ष – संजय लोळगे, प्रवक्ता – संजय घुगे, सहकार्यवाह– अविनाश कराळे, अभिजीत दरेकर, सुनील राऊत, संघटक– पुरुषोत्तम (विलास) कुलकर्णी.

कार्यकारणी सदस्य – प्रा. शुभांगी कुंभार, सतीश काळे, डॉ. राजेंद्र साबळे, शिवचरण शिवाजी, प्रा. योगेश विलायते, जालिंदर शिंदे, विशाल कडुसकर.

Deshdoot
www.deshdoot.com