मराठा आरक्षण; सरकारची बाजू भक्कम
Featured

मराठा आरक्षण; सरकारची बाजू भक्कम

Sarvmat Digital

ना.अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई- मराठा आरक्षणाबाबत झालेला कायदा टिकला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे. यासाठी चांगल्या वकिलांची टीम तयार केली आहे. यामध्ये ज्येेष्ठ विधीज्ज्ञ आहेत. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, त्या अनुषंगाने तयारी सुरु आहे.

17 मार्चला सुनावणी सुरु होईल. त्यासाठी योग्य पद्धतीने तयारी सुरु आहे. आपली बाजू भक्कम आहे. मराठा आरक्षणसंदर्भात सरकार गांभिर्याने प्रयत्न करत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण दिली.

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन पाठपुरावा करण्यासाठी मंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीने शनिवारी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांची भेट घेत मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. बैठकीनंतर बोलतांना चव्हाण म्हणाले, आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत कुठेही काही त्रुटी राहता काम नये म्हणून बैठक झाली.

दरम्यान, मुस्लिम आरक्षणासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना निर्णय घेण्यात आलेला आहे. आता याबाबत मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे.

समान किमान कार्यक्रमानुसार आम्ही निर्णय घेऊ. काल अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणासंदर्भात पुढील कारवाई करण्याची घोषणा केली. आमचे सरकार सर्व समाजांच्या हिताचे निर्णय घेईल, असे एकनाथ शिंदे स्पष्ट केले. त्यावरून त्यांनी ना.मलिक यांच्या घोषणेला पाठींबा दिल्याचा अर्थ काढला जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com