Wednesday, April 24, 2024
Homeनगरशहरातील करोना बफर झोन कमी करा

शहरातील करोना बफर झोन कमी करा

माणिक विधाते : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी ऑनलाईन संवाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना विषाणूचा वाढते प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात होत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील पदाधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. नगर राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी यावेळी शहरातील विविध प्रश्न आणि मुद्दे प्रदेशाध्यक्षांसमोर मांडले. तसेच शहरातील करोना बफर झोन कमी करण्याची मागणी केली.

- Advertisement -

यावेळी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स चर्चेत शहराच्या काही भागात करोनाबाधीत रुग्ण आढळ्याने तो परिसर हॉटस्पॉट करण्यात आला आहे. तर त्याच्या जवळील 2 किलो मीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आल्याने शहरातील अनेक व्यवसाय व दुकाने बंद करण्यात आली आहेत. नगर शहर हे छोटे असून, 2 किलो मीटरचा बफर झोनच्या अंतराची मर्यादा मोठी आहे. यामुळे निम्मे नगर शहर बंद अवस्थेत आहे. जो बफर झोन आहे. त्याठिकाणी दाळमंडई व किराणा व्यापारी असल्याने ही जीवनावश्यक सेवा देखील बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, बफर झोनची मर्यादा लहान शहरांसाठी कमी करण्यासंदर्भात त्यांनी पाटील यांच्यापुढे मुद्दा मांडला.

तसेच शहरातील मार्केटयार्ड येथील भाजीबाजार केडगाव येथे हलविण्याचा विचार असून, याला आ. संग्राम जगताप यांनी विरोध दर्शविला आहे. भाजीमार्केट केडगावला गेल्यास वाहतुकीचा खर्च वाढून परिणामी भाजीपाला देखील महागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अर्थचक्र पूर्वपदावर आणण्यासाठी चौथ्या लॉकडाऊन काळात व्यावसायिक, व्यापारी व उद्योजकांना अजूनही सवलती देऊन त्यांचा विचार करण्याची गरज असल्याचे प्रामुख्याने त्यांनी पाटील यांच्यापुढे मुद्दा उपस्थित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या