चंद्रापूरच्या आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
Featured

चंद्रापूरच्या आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Sarvmat Digital

लोणी (वार्ताहर) – राहाता तालुक्यातील चंद्रापूर गावाच्या हद्दीतील आयडीबीआय बँकेचे एटीएम शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. लोणी गावापासून जवळच असलेल्या आयटीआय कॉलेजवळ आयडीबीआय बँकेची चंद्रापूर शाखा असून तेथेच त्यांचे एटीएम आहे. या परिसरात अनेक महाविद्यालये व संगमनेर-नगर हा महामार्ग असल्याने रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. लोणी परिसरात एटीएम फोडीच्या घटना यापुर्वीही घडलेल्या आहेत. मात्र कोणतीही बँक तेथे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करीत नाही.

त्याचाच फायदा घेऊन एटीएम फोडीचे प्रकार घडत आहेत. आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी नारायणदास किसनदास वैष्णव यांनी लोणी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी सायंकाळी 6.30 ते शनिवार सकाळी 8 वाजेपर्यंत या काळात आयडीबीआय बँकेचे एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर स्प्रे मारून अज्ञात चोरट्यानी एटीएम च्या पैशाच्या ट्रे ला उजव्या बाजूने कापण्याचा प्रयत्न केला.लोणी पोलिसांनी भादंवि कलम 380, 427, 511 नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. स.पो.नि. प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. टी. व्ही. आदमाने पुढील तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com