नगर जिल्ह्यात काय सुरु होणार? काय बंद राहणार ?

नगर जिल्ह्यात काय सुरु होणार? काय बंद राहणार ?

राज्यात लॉकडाऊनमध्ये झोननिहाय शिथिलता

मुंबई- राज्यात 3 मे नंतर लॉकडाऊन वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करताना लॉकडाऊनमध्ये झोननिहाय शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. त्यानुसार रेड झोनमधील मुंबई, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका या क्षेत्रात मात्र लॉकडाऊनमध्ये कुठलीही शिथिलता देण्यात आलेली नाही.

राज्य सरकारने झोन जाहीर केले आहेत. ऑरेंज झोनमध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश आहे. या आदेशातील बाकीच्या सर्व बाबी काल शुक्रवारी केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशाप्रमाणेच राहतील, असे सांगण्यात आले. यामध्ये अहमदनगर, बीडचा समावेश आहे. त्यामुळे नगरकरांना दिलासा मिळाला आहे.

रेड झोन
बस, रिक्षा, टॅक्सी बंद राहणार
सलून बंद राहणार
ग्रामीण भागातील सर्व दुकाने नियम पाळून खुली करण्याचा निर्णय
मात्र ग्रामीण भागातील मॉल सुरू होणार नाही
रेड झोनमधील महापालिका क्षेत्र मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, मालेगाव वगळून इतर शहरांमधील सर्व प्रकारची दुकान सुरू होणार
वरील महापालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत सुरू होणार
सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकार्‍यांची 100 टक्के उपस्थिती असणार
त्याखालील कर्मचार्‍यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित
रेड झोनमधील 14 जिल्हे
मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, सातारा, पालघर, पुणे, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नाशिक, अकोला, यवतमाळ.

रेड झोनमधील मुंबई, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका ही क्षेत्र वगळून ग्रामीण भागात मॉल्स, शॉपिंग कॉम्पलेक्स वगळून सर्व प्रकारची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ऑरेंज झोन

बस वाहतूक बंद राहणार
टॅक्सी, रिक्षा सेवा सुरू होणार
एक वाहक आणि दोन प्रवासी अशी परवानगी
खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत सुरू होणार
सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकार्‍यांची 100 टक्के उपस्थिती असणार
त्याखालील कर्मचार्‍यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित
अत्यावश्यक सेवांसह आता इतर दुकान सुरू होणार (मॉल सोडून)
ऑरेंज झोनमधील 16 जिल्हे- रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, रायगड, अहमदनगर, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, परभणी, नंदूरबार.

ग्रीन झोन
सगळं सुरु करायला परवानगी
50 टक्के प्रवासी क्षमतेने ग्रीन झोनमध्ये बस सेवा सुरू होणार
बसच्या फेर्‍या ग्रीन झोनमध्येच असणार त्याच्या क्षेत्राबाहेर बस जाणार नाही
खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत सुरू होणार
सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकार्‍यांची 100 टक्के उपस्थिती असणार
तर त्याखालील कर्मचार्‍यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित
ग्रीन झोनमधील 6 जिल्हे- सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, गोंदिया, वाशिम, वर्धा, गडचिरोली.
सलून, स्टेशनरी, दारू दुकानांबाबत गृहमंत्रालयाची नियमावली जारी

नवी दिल्ली – करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. येत्या 3 मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान काही गोष्टींवर सुटही देण्यात आली आहे. 4 मेपासून सुरु होणार्‍या लॉकडाऊनच्या तिसर्‍या भागात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून उघडण्यास सशर्त परवानगी असेल, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केलं. त्याशिवाय, इ-कॉमर्स कंपन्या या क्षेत्रात अत्यावश्यक सामांनांव्यतिरिक्त इतर सर्व वस्तूंची विक्री करु शकतील.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून उघडण्याची परवानगू असेल. येत्या 4 मेपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील केंद्र सरकारने सलून, ब्युटीपार्लर, दारू दुकाने आणि पानटपर्‍या, स्टेशनरी दुकाने सुरू करण्यास काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये या सेवा 4 मे पासून सुरू होणार आहेत. अशी माहिती गृह मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने दिली. मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य असेल.

रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय नाही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नवी नियमावली जारी केली आहे. ही नियमवामली फक्त काही मर्यादित क्षेत्रात लागू असेल. यानुसार, गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपर्‍या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com