Friday, April 26, 2024
Homeनगरलॉकडाऊनमुळे शेतकर्‍यांची पीककर्जाकडे पाठ

लॉकडाऊनमुळे शेतकर्‍यांची पीककर्जाकडे पाठ

जिल्हा बँक : अवघे 1 टक्के कर्ज वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात आशिया खंडात नावाजलेल्या जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने 1 एप्रिलपासून खरीप हंगाम पिककर्ज वाटपला सुरूवात केली आहे. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोना विषाणूचा संसर्गामुळे शेतकर्‍यांनी बँकेकडे पाठ फिरवली असून गेल्या 15 दिवसांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा अवघे 1 टक्काच कर्ज वाटप झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांना पिक कर्जाचे वाटप करण्यात येते. खरीप हंगामासाठी बँकेकडून दरवर्षी 1 एप्रिलपासून पिककर्ज वाटपाचा श्रीगणेशा करण्यात येतो. यंदा कोरोना संसर्गाच्या उद्रेकात बँकेच्या संचालक मंडळाने शेतकर्‍यांसाठी यंदाच्या खरीप हंगामासाठी पिक कर्ज वाटप सुरू केले आहे. मात्र, गेल्या 15 दिवसांत शेतकर्‍यांनी लॉकडाऊन आणि कोरोना उद्रेकाच्या संकटामुळे बँकेकडे पाठ फिरवली आहे.

जिल्हा बँकेच्या ग्रामीण भागात सर्वाधिक शाखा आहेत. मोठ्या संख्याने बँकेने बँकेच्या शाखांचे ग्रामीण भागात शाखा असतांनाही आणि 1 एप्रिलपासून पिक कर्ज वाटप सुरू केलेले असतांनाही आतापर्यंत बँकेकडून शेतकर्‍यांनी 1 कोटी 5 लाख रुपयांचे पिक कर्ज उचलेलेले आहे. यात वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या रक्कमेत कर्ज उपलब्ध असून बाजरी पिकासाठी एकरी 17 हजार तर ऊस पिकासाठी एकरी 49 हजार रुपयांचे कर्ज बँकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. लॉकडाऊनच्या काळात बँकेच्या शाखा जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत सुरु असल्या तरी शेतकरी मात्र, पिक कर्जासाठी बँकेत फिरकत नसल्याचे चित्र आहे.

गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी घेतलेल्या कर्जाला भरण्यास सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी 31 मार्चला खरीप हंगामाचे कर्ज परत फेडणार्‍या शेतकर्‍यांना व्याजात सवलत मिळत होती. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे ही मुदत 31 जूनपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. यामुळे शेतकर्‍यांना गेल्यावर्षीचे खरीपाचे कर्ज परतफेडीसाठी जादा व्याज आकारण्यात येणार नसल्याचे जिल्हा बँकेकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या