Friday, April 26, 2024
Homeनगरलॉकडाऊनच्या काळात धार्मिक स्थळाजवळ वावर

लॉकडाऊनच्या काळात धार्मिक स्थळाजवळ वावर

पिंपरी निर्मळ येथे पकडून लोणीच्या दोघांवर गुन्हे दाखल

पिंपरी निर्मळ (वार्ताहर) – कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे देशात एकवीस दिवसांची संचारबंदी लागु करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्याअन्वये पिंपरी निर्मळ गाव पुर्णपणे बंद आहे. मात्र येथील एका धार्मिक स्थळाच्या परीसरात लोणी येथील दोघांना अटक करण्यात आली. शासनाच्या आदेशाचे पालन करीत ग्रामस्थ घरात बसून आहेत. मात्र बाहेर गावातील काही लोक धार्मिक कारणाने गावात फेरफटके मारत असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पिंपरी निर्मळ येथील धार्मिक ठिकाणी वावर करत असलेल्या लोणी येथील दोघांना पकडून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

देशात व राज्यात कोरोनाचा विषाणुचा मोठा प्रादूर्भाव होत आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने एकवीस दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. त्याअर्तगत सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली असून, संचारबंदीही लागू करण्यात आहे. त्याचबरोबर पिंपरी निर्मळ ग्रामस्थांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन केलेला आहे.

गावात विषाणुचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून गावाला जोडणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. गर्दी होवू नये यासाठी गावातील सर्व यात्राही स्थगित करण्यात आल्या आहेत. सर्व मंदिरांना कुलूप लावण्यात आले आहेत. शासनाच्या व ग्रामपंचायतीच्या निर्देशाप्रमाणे ग्रामस्थ काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन करीत आहेत. मात्र एका देवस्थानाच्या दर्शनाच्या निमित्ताने बाहेरगावचे नागरीक गावात राजरोसपणे फिरत असल्यामुळे ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन कमेटीच्या सदस्यानी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी याबाबत गावचे पालक अधिकारी श्री. वाघचौरे तसेच लोणी पोलीस स्टेशनला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याअंतर्गत पिंपरी निर्मळ येथील धार्मिक स्थळाच्या आसपास फिरतांना लोणी येथील शहारूख पठाण व शबनम पठाण यांना लोणी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी या दोघांविरुध्द गु. र. नं. 178/20 अन्वये भा. दं. वि. कलम 188, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (प) तसेच भारतीय साथीचें रोग 1897 चे कलम 2, 3, 4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संबंधीत व्यक्तींना कोरोना तपासणीसाठी लोणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. फटांगरे करत आहेत.

लोणीतील कोरोनाबाधीत व्यक्तीमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत
पिंपरी निर्मळमध्ये अटक केलेले नागरिक लोणीतील कोरोना रुग्ण सापडलेल्या भागातील आहे. तो भाग पुर्णपणे पोलिसांनी सील केलेला आहे. तरीही या व्यक्ती पोलिसांना गुंगारा देवून लोणीहुन पिंपरी निर्मळला आले होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीने तो सर्व परीसर जंतुनाशक फवारणी करून निजंर्तुक केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या