Saturday, April 27, 2024
Homeनगरलॉकडाऊन व सीमा बंदीचा कांदा उत्पादकांना प्रचंड फटका

लॉकडाऊन व सीमा बंदीचा कांदा उत्पादकांना प्रचंड फटका

विक्री थांबली; साठवणुकीची सोय नसलेल्या शेतकर्‍यांपुढे मोठा पेच

राजुरी (वार्ताहर)- अवकाळी पाऊस, निर्यातबंदी या संकटांमुळे कांदा उत्पादक हैराण झालेले असतानाच कोरोनामुळे निर्यात सुरु होऊ शकली तर नाहीच शिवाय कांदा सर्व कांदा मार्केट चालू नसल्याने कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाली असून कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहेत. परिस्थिती केव्हा सुरळीत होईल हे कोणीच सांगू शकत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 दिवसाचा लॉकडाऊन संपत असतानाच तो आणखी 30 एप्रिलपर्यंत वाढवली गेली आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आपल्या शेतात पिकविलेल्या कांदा पिकाची काढणी करत आहे. सध्या मार्केट बंद असल्यामुळे हा काढलेला कांदा साठवून ठेवण्यासाठी कांदा चाळ बनवण्याचे काम अनेक शेतकरी आपल्या शेतात करत आहे. काही शेतकरी मात्र शेतातच झाडांच्या सावली खाली कांदा साठवून ठेवताना दिसत आहे. एकूणच शेतकर्‍यांवर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने अनेक संकटे येत असून त्याला सामोरे जाताना शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतात बांधावर कांद्याला अवघा 600 ते 1200 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. राज्यातील सर्व सीमा बंद असल्यामुळे वाहतूकही पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे कांदा व्यापारीही मर्यादीत प्रमाणातच कांदा खरेदी करत आहेत.

21 दिवसाच्या लॉकडाऊनच्या काळात शेतातील कांदा, गहू या पिकासह सर्वात जास्त द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. राहता तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील शेतकरी कांदा मिळेल त्या भावात विक्री करत आहे. व्यापारीही आपल्या मनमानी भावात कांदा खरेदी करताना दिसत असून यामुळे शेतकर्‍यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. मागील खरीप हंगामात राज्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले होते. यंदाही संकटाची पुनरावृत्ती झाल्याने विक्री अभावी माल शेतात पडून राहिल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी चिंताक्रांत बनला आहे.

कोरोनाच्या आलेल्या संकटामुळे शेतमालाची विक्री कमी होत आहे. तसेच परराज्यात होणारी शेतमालाची वाहतूक बंद असल्याने कांद्याच्या भावामध्येही मोठी घट झाली असल्याचे मत शेतकरी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख शिवाजी जवरे व कार्यकर्ते बाळासाहेब भालेराव यांनी व्यक्त केले.

.

- Advertisment -

ताज्या बातम्या