नगर – स्कूल व्हॅनमधून विदेशी दारुची वाहतूक ; एकास अटक

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) – स्कूल व्हॅन मधून विदेशी दारुची वाहतूक करून विक्री करणाऱ्या एकाला भिंगार कँम्प पोलिसांनी बुधवारी आज दुपारी अटक केली आहे. संजय एकनाथ लोणारे (रा. कापुरवाडी ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे चार हजार ६८० रुपये किंमतीच्या ३६ विदेशी दारुच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी व्हॅन (क्र. एमएच- 12 एएफ- 4889), दारु असा एक लाख ५४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणारे विरुद्ध भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी शहर उपअधीक्षक संदीप मिटके, भिंगार कँम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील भिंगार पोलीस ठाण्यात असताना, सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील यांना माहिती मिळाली की, नगर ते कापुरवाडी रोडवर नागरदेवळे फाटा येथे नागरदेवळे कमानी जवळ एक इसम पिवळ्या रंगाच्या मारुती स्कूल व्हॅन मध्ये विक्री करत आहे. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील उपनिरीक्षक पंकज शिंदे, पोलीस नाईक आर. ए. सुद्रीक, पोलीस शिपाई सचिन धोंडे यांच्या पथकाने नागरदेवळे फाटा येथील कमानी जवळ जाऊन छापा टाकला. यावेळी स्कूल व्हॅनची तपासणी करण्यात आली. यामध्ये विदेशी दारू मिळून आली. पोलिसांनी लोणारे याला अटक केली असून व्हॅन व दारू जप्त केली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार पोलिसांनी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *