फळ वाहतूक पिकअपमध्ये दारुची वाहतूक; दोघे ताब्यात
Featured

फळ वाहतूक पिकअपमध्ये दारुची वाहतूक; दोघे ताब्यात

Sarvmat Digital

चार चाकी वाहनासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – फळ वाहतूक करणार्‍या पिकअपमध्ये (क्र. एमएच- 17 बीवाय- 1617) दारुची वाहतूक करणार्‍या दोघांना कोतवाली पोलिसांनी बुधवारी (दि. 13) एक वाजता नगर शहरातील न्यू टिळक रोडवर ताब्यात घेतले. रामचंद्र भिमराव लोकरे (वय- 27), दीपक भारत शेळके (वय- 25 दोघे रा. कंदर ता. करमाळा, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दारुच्या 23 बाटल्या व पिकअप असा सहा लाख 13 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नगर शहरातील सक्कर चौक बिस्कीट कारखाना रोडने न्यू टिळक रोड येथे एक फळ वाहतूक करणारा पिकअप वाहन दारुची विक्री करण्याकरिता दारुची वाहतूक करत आहे. अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक वाघ यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पथकाने न्यू टिळक रोडवर बुधवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक नाकाबंदी करून खाजगी वाहनांची तपासणी केली असता रामचंद्र लोकरे व दीपक शेळके यांच्या ताब्यातील पिकअपमध्ये दारू मिळून आली. पोलिसांनी पिकअप, दारुच्या बाटल्या असा सहा लाख 13 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास वाघ, पोलीस नाईक गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, पोलीस शिपाई सुजय हिवाळे यांच्या पथकाने केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com