अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचे आदेश
Featured

अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचे आदेश

Sarvmat Digital

संगमनेर (वार्ताहर) – कोरोनामुळे देशभरातील शिक्षण संस्था पूर्णता लॉकडाऊन झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार किंवा कसे या संदर्भात संभ्रम असताना केवळ अंतिम वर्षाचा द्वितीय सत्राच्या परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासंदर्भात काही राज्यांनी असमर्थता व्यक्त केली होती. मात्र आज झालेल्या वेबिनार बैठकीत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील सर्व विद्यापीठांनी ,शिक्षण संस्थांनी अंतिम वर्षाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित आजच्या वेबिनार बैठकीत विविध राज्यांच्या उच्च शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कुलगुरू, प्राध्यापक, मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी यादी चित्रे शिक्षणाच्या प्रक्रियेत केंद्र सरकार गंभीरपणे पाहत आहे. असे नमूद करून त्यांनी परीक्षा संदर्भात केंद्र सरकार तडजोड करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी परीक्षांना घेण्यासंदर्भात पाठविलेल्या पत्राने झालेली संभ्रमावस्था दूर होण्यास मदत होणार आहे. अखेर उच्च शिक्षणातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com