Thursday, April 25, 2024
Homeनगरकुकाण्यातील विलगीकरण कक्षात ग्रामसुरक्षा समितीला शिवीगाळ करुन व्हिडीओ केला व्हायरल

कुकाण्यातील विलगीकरण कक्षात ग्रामसुरक्षा समितीला शिवीगाळ करुन व्हिडीओ केला व्हायरल

सरपंचांच्या फिर्यादीवरुन ग्रामपंचायत कर्मचार्‍यासह अन्य एकावर गुन्हा दाखल

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील शाळेत असलेल्या क्वारंटाईन कक्षात अनाधिकाराने सोशल डिस्टन्सिंग न पाळता व तोंडाला मास्क न लावता प्रवेश केला तसेच तिथे करोना ग्रामसुरक्षा समिती सदस्यांना शिव्या दिल्या व त्याचा व्हिडीओ तयार करुन तो व्हायरल केल्याची घटना नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे घडली असून याबाबत सरपंचांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी कुकाणा ग्रामपंचायतच्या एका कर्मचार्‍यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याबाबत कुकाण्याच्या सरपंच मी सौ. छाया कारभारी गोर्डे (वय-43) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, गावात करोना ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्यात आलेली असून सदर समितीमध्ये मी अध्यक्ष असून सदस्य म्हणून तलाठी-प्रदिप चव्हाण व ग्रामसेवक सुभाष बाजीराव गर्जे असे आहेत. बाहेरुन गावात वास्तव्यास आलेल्या लोकांना कुकाणा माध्यमिक विद्यालय कुकाणा येथे 10 दिवसांकरीता विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. येथील लोकांच्या देखभाल व सुरक्षेसाठी ग्रामपंचायात कर्मचारी यांची 12-12 तासांकरीता नेमणूक करण्यात आलेली आहे.

30 मे रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपावेतो ग्रामपंचायत कर्मचारी राजमहमद जमिर इनामदार याला विलगीकरण कक्षा समोर देखभाल व सुरक्षेची ड्युटी नेमण्यात आली होती. या दिवशी दुपारी 4 वाजेच्या सुमारास गावातील लोकांचे फोन आले की ग्रामपंचायातच्या संदर्भात व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांनतर आमचे ग्रामपंचायत सदस्य भाउसाहेब किसन फोलाने यांनी माझ्या मोबाईलवर एक व्हिडीओ पाठविला त्यात आमच्या गावातील करोना विलगीकरण कक्षासमोर सुरक्षा व देखभाली करीता नेमण्यात आलेले कर्मचारी राजमहमद जमीर इनामदार व त्याच्या सोबत गणेश बाळासाहेब लोंढे असे दोघे विलगीकरण कक्षामध्ये तोंडाला मास्क न लावता तसेच कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरताना दिसत होते.

त्यांनतर आणखी काही व्हिडीओ माझ्या मोबाईलवर आले त्यामध्ये सदरचे दोन्ही इसम हे करोना ग्रामसुरक्षा समितीला शिवीगाळ करत होते. विलगीकरण कक्षात तोंडाला मास्क न लावता अनाधिकाराने प्रवेश करुन कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग न पाळता विलगीकरण कक्षामध्ये आम्हाला शिवीगाळ करतानाचे व्हीडीओ तयार करुन ते सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे. तसेच जिल्हाधिकारी सो अहमदनगर यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील दोघांवर भारतीय दंड विधान कलम 452, 188, 269, 270, 290 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (3) प्रमाणे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले तसेच महाराष्ट्र करोना कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 व भारतीय साथरोग अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या