कोतूळ येथे उद्या बैठा सत्याग्रह
Featured

कोतूळ येथे उद्या बैठा सत्याग्रह

Sarvmat Digital

कोतूळ (वार्ताहर)- पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करा, कोतूळ पुलाचे काम तातडीने सुरू करा या सह अकोले तालुक्यातील कोतूळ आणि सातेवाडी जिल्हा परिषद गटातील विविध प्रश्न तातडीने मार्गी लावावेत या मागण्यांसाठी मार्क्सवादी किसान सभा, पिंपळगाव खांड धरण कृती समिती कोतूळ व तोलारखिंड विकास कृती समिती कोतूळच्यावतीने कोतूळच्या मुख्य चौकात भव्य मुक्कामी बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. सोमवार दि. 3 पासून हे आंदोलन सुरू होणार असल्याची माहिती कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी दिली.

कोतूळ आणि सातेवाडी परिसरातील अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. कोतूळ सातेवाडी परिसरातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करा, फोफसंडी, गारवाडी, सातेवाडी परिसरातील नवीन जलसाठ्यांचे नियोजन करा, कोतूळ पुलाचे काम तातडीने चालू करा, पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करा, पिंपळगाव खांड बंधार्‍याच्या खालच्या भागात छोटे बंधारे बांधा, कोतूळ, सातेवाडी परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करा, घाट रस्त्याला सुरक्षा कठडे बांधा व पूर परिस्थितीत बंद होणारे ओढ्यांचे पूल यांची उंची वाढवा, पात्र वनजमीनधारकांच्या नोंदी 7/12 उतार्‍यावर करून उर्वरित जमीन धारकांचे दावे पात्र करा व प्रमाणपत्रावरील नोंदी दुरुस्त करा, फोफसंडी, कातरमाळ, पिंपळदरी व बोरी या भागातील विजेपासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांना विद्युत पोल द्या, पर्यटनासाठीचे कोथळे ते हरिश्चंद्रगड तसेच फोफसंडी कोंबड किल्ल्याचा रस्ता यांची कामे त्वरित सुरू करा, कोतूळ-राजूर,कोतूळ- ओतूर-बेलापूर एसटी बसच्या संख्येत वाढ करा, बंद केलेल्या एसटी बसेस चालू करा, कोतूळ पोलीस स्टेशनला पोलीस कर्मचारी वाढवा व कोतूळ चौकात ट्राफिक कर्मचारी नियुक्त करा, आळेफाटा-नारायणगाव याठिकाणी अकोले तालुक्यातील मजुरांसाठी निवासगृह बांधा, अंबितखिंड कोतूळची भांगेवाडी कृष्णा खोर्‍यात वर्ग करा, अशा विविध मागण्यांसाठी आज सोमवारी सकाळी 11 वाजेपासून येथील मुख्य चौकात मुक्कामी बैठा सत्याग्रह सुरू केला जाणार आहे.

परिसरातील नागरिकांनी या सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कॉ. सदाशिव साबळे, कॉम्रेड नामदेव भांगरे, कॉम्रेड अजित नवले, सरपंच अनुसया धराडे, रवींद्र आरोटे, रवींद्र देशमुख, बबलू देशमुख, गुलाब खरात, ज्ञानेश्वर काकड, खेमा भोजने, योगेश जगताप, अरविंद देशमुख, चंद्रकांत घाटकर, सचिन गीते, निलेश तळेकर, साहेबराव घोडे, शिवराम लहामटे, निवृत्ती वळे, राजु गंभीरे, भाऊ घोडे, हरिश धोंगडे, निंबा कचरे, एकनाथ मेंगाळ, चंद्रभान मुठे, तुकाराम वायाळ, शांताराम वारे, योगेश बांबळे, सखाराम मेंगाळ, प्रकाश साबळे, सोमनाथ भांगरे, सोमनाथ पिचड, एकनाथ बर्डे, सुरेश गिरे भीमा मुठे, महेंद्र मुठे यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com