सुपा कंपनीतील कामगारांना कोरोना व्हायरसचा धोका टळला
Featured

सुपा कंपनीतील कामगारांना कोरोना व्हायरसचा धोका टळला

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – सुपा (ता. पारनेर) येथील एका कंपनीतील 27 जण चीनमध्येे प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यांना कोरोना व्हायरस नसल्याचे तपासणीअंती सिद्ध झाले आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी या सर्वांची तपासणी पूर्ण केली असल्याची माहिती डॉ. दादासाहेब सांळुके यांनी दिली.चीनमधील बुहान शहरात कोरोना व्हायरसची मोठ्या प्रमाणात लागण झाल्यानंतर भारतात आलेल्या व येणार्‍या प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

सुपा येथील एका कंपनीतील 27 जण चीन येथे औद्योगिक प्रशिक्षणासाठी गेले होते. 18 जानेवारीला ते नगरला परतले. त्यातील चार जणांनी जिल्हा रूग्णालयात येऊन तपासणी केली त्या चौघांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे तपासणीतून समोर आले. तर, उर्वरीत 23 जणांची तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील एक पथक बुधवारी (दि. 5) सुपा कंपनीत गेले होते. त्यांची तपासणी करण्यात आली.

त्यांना कोरोनाचा संसंर्ग नसल्याचे तपासणीतून समोर आले आहे. चीनमधील बुहान शहरात कोरोना व्हायरसची लागण झाली होती त्या शहरापासून 27 जण सुमारे नऊशे किलोमीटर असलेल्या एका शहरामध्ये होते. तसेच, ते 18 जानेवारीला भारतात परत आले आहेत. यामुळे त्यांना 14 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्याने कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका नसल्याचे सांळुके यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com