Wednesday, April 24, 2024
Homeनगरकोपरगाव तालुक्यात 4 हजार 388 नागरिक होम क्वारंटाईन

कोपरगाव तालुक्यात 4 हजार 388 नागरिक होम क्वारंटाईन

परदेशातून आलेत 74 नागरिक

कोपरगाव (प्रतिनिधी) – तालुक्यात 31 मार्च अखेर परदेशातून, परराज्यातून, जिल्ह्या व तालुका बाहेरून आलेल्या 4 हजार 388 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. व 28 दिवस घराबाहेर न पडण्याची सुचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहे.

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसात विविध ठिकाणाहून आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामध्ये चासनळी प्राथमिक केंद्रांतर्गत परदेशातून 6, परराज्यातून 5, जिल्ह्याबाहेरून 707, तालुका बाहेरून 51 एकूण 769 नागरिक, दहिगाव बोलका प्राथमिक केंद्रातर्गत परदेशातून 3, परराज्यातून 15, जिल्ह्याबाहेरून 725, तालुका बाहेरून 56 एकूण 799 नागरिक, पोहेगाव प्राथमिक केंद्रांतर्गत परदेशातून 2, परराज्यातून 7, जिल्ह्याबाहेरून 924, तालुका बाहेरून 7 एकूण 940 नागरिक, संवत्सर प्राथमिक केंद्रातर्गत परदेशातून 11, परराज्यातून 6, जिल्ह्याबाहेरून 441, तालुका बाहेरून 2 एकूण 460 नागरिक, टाकळी ब्राम्हणगाव प्राथमिक केंद्रातर्गत परदेशातून 6, परराज्यातून 55, जिल्ह्याबाहेरून 703, तालुका बाहेरून 87 एकूण 851 नागरिक, वारी प्राथमिक केंद्रातर्गत परदेशातून 1, परराज्यातून 3, जिल्ह्याबाहेरून 125, एकूण 129 नागरिक, कोपरगाव नगरपरिषदेच्या नागरी प्राथमिक केंद्रातर्गत परदेशातून 44, परराज्यातून 17, जिल्ह्याबाहेरून 477, एकूण 538 अशा एकूण 4 हजार 912 नागरिकांची नोंद झाली आहे.

त्यापैकी परदेशातून आलेल्या एकूण 74 पैकी 58 नागरीक होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तर उर्वरित 16 नागरिकांचा 28 दिवसांपेक्षा जास्त कालवधी झालेला आहे. त्यांना यात घेतलेले नाही. त्यामुळे सद्या एकूण 4 हजार 388 नागरिकांना होम क्वारंटाईन करून त्यांच्या हातावर तसे शिक्के मारण्यात आले आहे.

परदेशातून, तालुकाबाहेरुन, जिल्हाबाहेरुन आणि राज्याबाहेरुन आलेल्या व्यक्तींना 14 दिवस पूर्णतः विलगीकरणात आणि पुढील 14 दिवस मोजकाच आवश्यक संपर्क एक मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवून राहण्यासंदर्भात सूचना दिली आहे. प्रशासन यावर बारकाईने नजर ठेवून आहे.
– डॉ. संतोष विधाते, तालुका वैद्यकीय अधिकारी.

- Advertisment -

ताज्या बातम्या