Wednesday, April 24, 2024
Homeनगरकोपरगावमध्ये 100 बेडचे कोव्हिड केअर सेंटर सज्ज

कोपरगावमध्ये 100 बेडचे कोव्हिड केअर सेंटर सज्ज

कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी प्रशासन सज्ज – आ. आशुतोष काळे

कोपरगाव (प्रतिनिधी)- कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी प्रशासनाने कोपरगाव येथील एस. एस. जी.एम. कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात 100 बेडचे कोव्हिड केअर सेंटर सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील साठ वर्षीय महिलेचे कोरोना संसर्गाने निधन झाले असून शिंगणापूर येथील एका महिलेचे सारी सदृश आजाराने निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे.

लॉकडाऊन काळात सर्दी, खोकला, ताप अशा रुग्णांसाठी आ.आशुतोष काळे यांनी फोनच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांचा मोफत वैद्यकीय सल्ला तसेच गरजू रुग्णांसाठी कम्युनिटी क्लिनिक देखील सुरू केले असून शेकडो रुग्णांना लॉकडाऊनच्या काळात नियमितपणे वैद्यकीय सेवा मिळत आहे.

प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेण्यासाठी ज्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप, दमा व श्वास घेण्यास त्रास होत असेल अशा रुग्णांना भरती करून उपचार करण्यासाठी एस.एस.जी.एम. कॉलेज येथील मुलींच्या वसतिगृहात 100 बेडचे कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.

या कोव्हिड केअर सेंटरमध्ये खाजगी व सरकारी डॉक्टर या रुग्णांवर उपचार करणार असून वरिष्ठ स्तरावरून परवानगी मिळताच हे कोव्हिड केअर सेंटर लवकरच सुरू होणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाटे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, पोलीस निरीक्षक अनिल कटके अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत असून नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घरातच बसून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या