कोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.!
Featured

कोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.!

Sarvmat Digital

कोपरगाव (प्रतिनिधी) – जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने देशासह राज्यातील नागरिकांना व्हायरसची मोठ्या प्रमाणात लागण झाली असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी हँडसॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे बाजारात हँड सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक कंपन्यांनी बनावट हँडसॅनिटायझर बाजारात आणले असून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

कोरोना व्हायरसचे संकट व हँड सॅनिटायझरचा निर्माण झालेला तुटवडा दूर करण्यात मदत व्हावी या उद्देशातून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी हँडसॅनिटायझरचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com