पोटासाठी ते कर्जतहून नगरला आले पायी
Featured

पोटासाठी ते कर्जतहून नगरला आले पायी

Sarvmat Digital

प्रशासनाने सोय केली पण ते थांबलेच नाही

अहमदनगर (प्रतिनिधी)- हाताचे काम बंद झाले अन् पोटाची चिंता सतावू लागली. वाहने बंद झाल्याने त्यांनी गावाकडे पायी जाण्याचा निर्णय घेतला. रात्रीतून त्यांनी कर्जत-नगर अंतर पार केले. नगरमध्ये त्यांना प्रशासनाने अडवून जेवण दिले. निवासाची सोयही केली, पण त्यांचे मन रमले नाही. नगर प्रशासनाचा पाहुणचार घेऊन ते धुळ्याकडे रवाना झाले.

धुळे जिल्ह्यातील मुळचे शिरपुर येथील ३२ मजुर कर्जत येथे कामानिमित्त राहत होते. कोरोना लॉकडाऊनमुळे या मजुरांच्या हातचे काम गेले. त्यामुळे उपासमार सुरू झाली. मग आता गावी जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही, पण वाहतुकीची साधनेही बंद. त्यामुळे त्यांनी पायी घरी जाण्याचा निर्णय घेत रात्रीत्च कर्जत सोडले. पायी ते नगरला पोहचले.

आज दुपारी त्यांना अरणगाव बायपास येथे तलाठी संतोष पाखरे यांनी अडवित विचारपूस केली. या मजुरीची कहाणी तहसीलदार प्रशासकीय अधिकाºयांना दिली. मेहेरबाबा ट्रस्टशी संपर्क साधून त्यांच्या खाण्याची, राहण्याची सोय केली. पण ते मजूर नगरला थांबण्यास तयारच होईना. मग त्यांना ट्रस्टच्या बसने केडगाव बायपासपर्यंत सोडविण्यात आल. तेथून त्यांचा पायी प्रवास पुढे सुरू झाला. तलाठी संतोष पाखरे यांनी त्यांना पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्सही सोबत दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com