के. के. रेंज प्रकरणी आज नगरला बैठक
Featured

के. के. रेंज प्रकरणी आज नगरला बैठक

Sarvmat Digital

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची उपस्थिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी संरक्षण खात्याने ताब्यात घेतलेल्या आहेत व यापुढील काळात सुमारे 25 हजार हेक्टर भूसंपादन करून विस्तारीकरणाचे प्रयत्न सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत आज सोमवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नव्याने होणार्‍या या विस्तारीकरणास राहुरी तालुक्यातील 17, नगर तालुक्यातील 5 व पारनेर तालुक्यातील 5 गावांनी विरोध केला आहे. या विस्तारीकरणामुळे ही 27 गावे बाधित होणार असल्याने या अन्यायकारक भूसंपादनाविरोधात संघटितपणे विरोध करण्यात येत आहे. पारनेरचे आ. लंके यांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. तसेच राळेगणमध्येही बाधित गावांच्या प्रमुखांची बैठक झाली. त्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नेतृत्व करावे असे साकडे त्यांना घालण्यात आले.

या प्रकरणी शेतकरी आंदोलन करीत आहेत. तसेच काही गैरसमजही आहेत. पण याबाबत प्रत्यक्ष काय कार्यवाही सुरू आहे. अथवा केली जाणार आहे. यावर चर्चा करण्यासाठी के. के. रेंजचे अधिकारी , संबंधित भूसंपादन अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, असे निर्देश ना. तनपुरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

जाणार्‍या या भूसंपादनाला विरोध होत आहे. मुळा धरण, म. फुले कृषी विद्यापिठ आणि के. के. रेंजला राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी जमिनी देऊन त्याग केलेला आहे. आताही विस्तारीकरणासाठी पुन्हा जमिनी घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याने शेतकरी हबकला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com