जनधन, पीएम किसान योजनेचे पैसे पोस्टद्वारे
Featured

जनधन, पीएम किसान योजनेचे पैसे पोस्टद्वारे

Sarvmat Digital

मुंबई – पोस्टाच्या पेमेंट बँकेत तुमचे खाते असेल आणि तुम्हाला इतर कोणत्याही बँकेतून पैसे हवे असतील, तर पोस्ट तुमच्यापर्यंत ते पैसे पोहोचवणार आहेत. बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी पोस्ट विभागाने हा निर्णय घेतला असून, त्यामुळे पोस्टाद्वारे बँक खात्यातील पैसे घरपोच मिळणार आहेत.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेमेंट बँक खाते आणि बँकेच्या खात्याला आधार आणि मोबाइल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.जनधन आणि पीएम किसान योजनेतील खातेदारांना याचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.

लॉकडाउनचा कालावधी आणखी 15 दिवसांसाठी (30 एप्रिलपर्यंत) वाढवण्यात आला आहे. तसेच लागोपाठ सुट्ट्या येत असल्याने अशा परिस्थितीत नागरिकांना रोख रकमेची आवश्यकता भासू शकते. एटीएमवरही भार येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बँकांमध्ये गर्दी वाढू शकते. याकरिता पोस्ट विभागाने एक उपाययोजना आखली आहे. एखाद्या व्यक्तीचे कोणत्याही बँकेत आणि पोस्टात खाते असल्यास त्या व्यक्तीला पैशांसाठी बँकेत जाऊन रांग लावण्याची गरज नाही. पोस्टाशी संपर्क साधल्यास पेमेंट बँकेद्वारे तुमच्या घरापर्यंत पोस्टाचा कर्मचारी पैसे घेऊन दाखल होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com