जम्मूत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Featured

जम्मूत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Sarvmat Digital

जम्मू – काश्मीरमधील अनंतनाग येथे लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणवर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आल्याचे समजते.

जम्मू-काश्मीरमधील बिजबेहरा येथील संगम भागात ही चकमक झाली. दोन्ही बाजुंनी मोठ्याप्रमाणावर गोळीबार झाला. जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. स्थानिक पोलीस, सीआरपीएफ आणि जवानांच्या संयुे पथकाने ही कारवाई केल्याची माहिती जम्मू पोलिसांनी दिली.

यावेळी घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला. दहशतवाद्यांनी मध्यरात्रीनंतर या परिसरात गोळीबार सुरू केला होता. यानंतर जवानांकडून संयुे मोहीम राबवण्यात आली. त्यात दोघांचा खात्मा झाला.

Deshdoot
www.deshdoot.com