Wednesday, April 24, 2024
Homeनगरप्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 परदेशी व 4 परराज्यातील व्यक्तींवर गुन्हा दाखल

प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 परदेशी व 4 परराज्यातील व्यक्तींवर गुन्हा दाखल

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- टुरीस्ट व्हीजा असताना देखील जामखेड येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन 14 जणांनी धार्मिक प्रचार केला तसेच व्हीजामध्ये दिलेल्या अटींचे व जिल्हा अधिकारी यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी 10 परदेशी व 4 परराज्यातील अशा एकुण चौदा नागरिकांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

यामध्ये आरोपी कोकन कोडीओ गॅस्टोन (रा. आयव्हरी कोस्ट,) कोने पेफीगोऊ हमीद (रा. आयव्हरी कोस्ट,) किटा मनाडो रा. (आयव्हरी कोस्ट,) कोमे अ‍ॅटोमो कपले मॅथीस (रा. आयव्हरी कोस्ट,) टोरे बकारी (रा. आयव्हरी कोस्ट,) राशीद सईदी (रा. टांझानिया,) माया सुलेमानी अ‍ॅथोमनी (रा. टांझानिया,) अब्दल्ला सुलीशा सईदी (रा. टांझानिया,) हैदरनीया अब्दुल नासीर (रा. इराण,) डोमबीया मोरी (रा. आयव्हरी कोस्ट,) पांचाभाई अब्दुल रहीम (रा. गुजरात,) मोहमद अली अमिन (रा. मुंबई,) मोहमद शाकीर (रा. तामिळनाडू,) शेख अल अमीन (रा. तामिळनाडू) अशा 14 जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

14 मार्च रोजी 10 परदेशी व 4 परराज्यातील नागरिक असे एकुण 14 जण नगर जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रमासाठी दाखल झाले होते. ते जामखेड येथील काझी गल्लीतील एका धार्मिक स्थळाच्या ठिकाणी होते. प्रशासनाच्या ही गोष्ट 25 मार्च रोजी लक्षात आल्यावर जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी धार्मिक स्थळाच्या तीन ट्रस्टी विरोधात गुन्हा दाखल करून या 14 जणांना कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी नगरला पाठविले होते.

यातील दोघांना कोरोनाची लागण झाली होती. या 14 जणांच्या संपर्कात आलेल्या 31 जणांना व 31 जणांच्या संपर्कात आलेल्या 39 जणांना नगरला तपासणीसाठी नगरला पाठवले होते. यातील पुन्हा शहरातील स्थानिक चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.

रविवार 5 एप्रिल रोजी फिर्यादी पोलिस कॉन्स्टेबल दत्तू अर्जुन बेलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 14 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरील 14 आरोपींनी कोव्हीड 19 अनुषंगाने पारीत केलेले सर्व आदेश माहित असताना ते प्रार्थनास्थळी एकत्रितपणे नमाज पठण, धार्मिक विधी व इस्लाम धर्म विचारसरणीवर प्रवचन करत होते.

त्यांनी व्हीजामध्ये दिलेल्या अटींचे, जिल्हाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून समाजातील इतरांचे आरोग्य धोक्यात येईल, अशा कृती केल्याने त्यांच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या