पती पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न; आठ जणांना अटक
Featured

पती पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न; आठ जणांना अटक

Sarvmat Digital

जामखेड (ता. प्रतिनिधी)– तालुक्यातील डोळेवाडी येथे घराची भिंत माझ्या हद्दीत आली असून संध्याकाळपर्यंत ती काढून न घेतल्याने 13 जणांनी रामदास खाडे व त्यांची पत्नीला तलवार, लोखंडी पाईप, गज, दगड व कुर्‍हाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पती-पत्नी यांनी घाबरून घरात जाऊन दरवाजा लावला व पोलिसांना संपर्क केला योगायोगाने पोलीस उपअधीक्षक संजय सातव जामखेड पोलिस स्टेशनला उपस्थित असल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व तेथील जमावाला पांगविले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व महिलेच्या फिर्यादीवरून 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे.

जामखेड पोलिसात कुसुम रामदास खाडे (रा. डोळेवाडी) यांनी फिर्याद देऊन शिवदास बाबासाहेब खाडे व त्यांचे मुले मोहन बाबासाहेब खाडे, सुभाष बाबासाहेब खाडे, विष्णू बाबासाहेब खाडे (रा. डोळेवाडी) यांच्या बरोबर शेतीचे बांध, सामायीक विहीर व पाईपलाईन याकारणावरून एक वर्षांपासून वाद चालू आहे. याबाबत वेळोवेळी जामखेड पोलिसात तक्रार अर्ज दिले आहेत.

दि. 29 रोजी दुपारी 11 वाजता रामदास खाडे घरासमोर बसले असताना दिर शिवदास खाडे व पुतण्या महादेव खाडे आले व त्यांनी तुमच्या घराची भिंत आमच्या हद्दीत येत असून ती भिंत संध्याकाळपर्यंत काढून टाका नाहीतर विहीरीत उचलून टाकू व शिवीगाळ दमदाटी करून निघून गेले शनिवार दि. 30 रोजी रात्री साडेबारा वाजता घरासमोर पती व मी झोपले असताना शिवीगाळ केल्याचा आवाज आल्याने उठून पाहिले असता शिवदास खाडे याच्या हातात लोखंडी पाईप, महादेव खाडे याच्या हातात तलवार, मोहन खाडे लाकडी काठी, अशोक खाडे लाकडी दंडुका, कृष्णा खाडे, सुभाष खाडे, सतिश खाडे, विष्णू खाडे, अजित खाडे, मनकर्णा खाडे, मंगल खाडे, शहाबाई खाडे, मनिषा खाडे हे गैरकायद्याची मंडळी जमा झाली.

रामदास खाडे यास मारण्यास सुरवात केली. सोडविण्यासाठी गेले असता अशोक खाडे, शिवदास खाडे, मोहन खाडे, मनकर्णा खाडे, मंगल खाडे, शहाबाई खाडे, मनिषा खाडे यांनी लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण व पोलीस पथक आल्याने आमचा जिव वाचला अशी फिर्याद कुसुम खाडे यांनी दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आठ जणांना अटक केली आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com