संगमनेरात तुरुगांधिकार्‍यांकडून कारागृहाची तपासणी
Featured

संगमनेरात तुरुगांधिकार्‍यांकडून कारागृहाची तपासणी

Sarvmat Digital

संगमनेर (शहर प्रतिनिधी)- संगमनेर कारागृहात कैद्यांचा पाहुणचार ठेवला जात असून त्यांना घरच्या डब्यासह तंबाखू, गुटखा मिळत असल्याबाबतचे वृत्त सार्वमतमध्ये प्रसिद्ध झाले. या वृत्ताने कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले. काल मंगळवारी दुपारी तुरुंग अधिकारी तथा नायब तहसीलदारांनी कारागृहाची पहाणी करून संबंधितांना कडक सूचना दिल्या.

संगमनेर येथील कारागृह गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आले आहे. या कारागृहातील 4 बराकीमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींना ठेवण्यात येते. कैद्यांना कायद्याप्रमाणेच वागणूक मिळावी अशी अपेक्षा असताना या कारागृहात मात्र कैद्यांना विविध सुविधा उपलब्ध होत असल्याची चर्चा होती. कैद्यांना गुटखा तंबाखू सहज उपलब्ध करून दिले जात असल्याचे निदर्शनास आल्याचे काहींनी सांगितले.

या प्रकरणाबाबत सार्वमतने वृत्त प्रकाशित केले. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. काल दुपारी तुरुंगाधिकारी तथा नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी कारागृहात जाऊन तपासणी केली. कारागृहात बंदोबस्ताला असलेले गार्ड यांना यावेळी त्यांनी काही सूचना केल्या. कारागृहात गैरप्रकार आढळल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

पोलिसांना सूचना
संगमनेर कारागृहातील कैद्यांना काही चैनीच्या वस्तू मिळत असल्याचे वृत्त समजताच तातडीने काल कारागृहाची तपासणी करण्यात आली. कारागृह गार्ड यांना कडक सूचना करण्यात आल्या. तसेच कैद्यांना भेटण्यासाठी कुणालाही परवानगी देण्यात येऊ नये असे पत्र पोेलीस अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. त्यानुसार अंमलबजावणी न झाल्यास पोेलीस अधिक्षकांना सविस्तर अहवाल सादर करण्यात येईल.
-सुभाष कदम, नायब तहसीलदार तथा तुरुंंगाधिकारी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com