Featured

कोरोना – केंद्रशासनाचा व्यापाऱ्यांना दिलासा

Sarvmat Digital

दिल्ली – कोरोनामुळे देशभरातील व्यापारी वर्गाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. व्यापारी वर्गाला दिलासा देणारी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

सरकारने सर्व करविषयक मुद्द्यांचे पालन करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत वाढवून जून अखेरपर्यंत केली आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी आयटी रिटर्न्सची मर्यादा 30 जून करण्यात आली आहे. यावरील व्याजदरही कमी करण्यात आला आहे. तसेच आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. परिषदेत ही माहिती दिली. छोट्या व मध्यम व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी जीएसटीच्या तारखेची मुदतह 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com