नगर : तोतयाची माळीवाड्यात हातसफाई
Featured

नगर : तोतयाची माळीवाड्यात हातसफाई

Sarvmat Digital

तीस हजाराचे गंठण लंपास

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेचा कर्मचारी असल्याचे सांगणार्‍या तोतयाने माळीवाड्यातील महिलेचे गंठण लंपास केले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

मिना कैलास माडगे (रा. गोंधळे गल्ली, माळीवाडा) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. दुपारच्या वेळी माडगे घरकाम करत होत्या. त्याचवेळी एक अनोळखी व्यक्ती घरासमोर आली. ‘मी महानगरपालिकेतून आलो आहे. तुमचे दीर हरिश माडगे यांना घरकुल मिळाले असून यादीत त्यांचे नाव आले आहे.

अडीच लाख रूपयांचा चेक त्यांना देण्यासाठी आणला आहे. बॅकेतून पैसे काढून हरिश यांना द्यायचे आहे. तुम्ही देताल का? अशी विचारणा करत त्या बदल्यात सोन्याची वस्तू द्या अशी मागणी केली. मांडगे यांनी घरातील 30 हजार किंमतीचे सोन्याचे गंठण तोतयाला दिले. कपाट बंद करण्यासाठी त्या घरात गेल्याची संधी साधत तोतयाने तेथून धूम ठोकली.

मांडगे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तोतयाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com