हॉटस्पॉटमुळे संगमनेर, मुकुंदनगर आलमगीर, जामखेडमध्ये सामसूम
Featured

हॉटस्पॉटमुळे संगमनेर, मुकुंदनगर आलमगीर, जामखेडमध्ये सामसूम

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी)- संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा, मुकुंदनगर, आलमगीर आणि जामखेड शहरात हॉयस्पॉट पॉकेट जाहीर केल्यामुळे या तिनही ठिकाणी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. अत्यावश्यक सेवांसह सर्व व्यवहार 14 एप्रिलला रात्री बारापर्यंत बंद ठेवण्यात आल्या असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी बंदोबस्त तैनात केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत आढळलेल्या रूग्णांमध्ये मुकुंदनगर, आलमगीर, जामखेड शहरातील रूग्णांची संख्या मोठी असल्याने प्रादुर्भाव क्षेत्र म्हणून या भागाचा समावेश केला आहे. त्यामुळे आज सकाळी आठपासूनच या भागांमध्ये उपाययोजना सुरू करण्यात आल्या. मुकुंदनगर, आलमगीर यांचा शहराशी पूर्ण संपर्क तोडण्यात आला आहे.

येथील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत. घरातून कोणीही बाहेर पडू नये, यासाठी बंदोबस्त तैनात केला आहे. हीच परिस्थिती जामखेड शहरातही आहे. राज्य राखील दलासह इतर तुकड्या आणि पोलीसांची नियुक्ती यासाठी केली आहे. या भागात राहणार्‍या नागरिकांना अत्यावश्यक सेवा सशुल्क पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी मुकुंदनगर भागासाठी अहमदनगर महापालिकेचे 97 कर्मचारी नियुक्त केले आहेत.

तसेच आलमगीर भागासाठी पंचायत समितीचे आणि जामखेडसाठी पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाचे कर्मचारी नियुक्त केले आहेत. यासाठी कंट्रोल रूम स्थापन केल्या असून, तेथे हेल्पलाईनसाठी संपर्क नंबर दिले आहेत. ज्यांना जिवनावश्यक वस्तू, औषधे याची गरज असेल, त्यांनी तेथे आपली मागणी नोंदवायची आहे. संबंधित कर्मचारी यासाठी लागणारे शुल्क संबंधिताकडून घेऊन त्या वस्तू पोहोच करणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com