संगमनेर-अकोले : नागरिकांना मिळणार घरपोच भाजीपाला
Featured

संगमनेर-अकोले : नागरिकांना मिळणार घरपोच भाजीपाला

Sarvmat Digital

संगमनेर (प्रतिनिधी) – जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासन वारंवार सूचना करत आहे, तरी देखील नागरिकांची गर्दी आहे.भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, संगमनेर- अकोले शहरात नागरिकांसाठी भाजीपाला, किराणा माल व दुग्धजन्य पदार्थ घरपोच मिळणार आहेत.मोबाईल द्वारे नोंदणी केल्यानंतर शेतकरी विकास गटाकडून भाजीपाला घरपोहच केला जाईल, त्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे, अशी माहिती संगमनेर प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे.

तसेच नागरिकांनी भाजीपाला, किराणा व दूध घेऊन येणारा टेम्पो इमारतीच्या आवारात आल्यानंतर अजिबात गर्दी करू नये, कुटुंबातील एका प्रतिनिधीने येऊन सदर मालाची खरेदी करावी, संबंधित व्यापाऱ्यांनी वाजवी दारातच माल विकावा, विनाकारण चढ्या भावात मालाची विक्री करू नये. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com