रणवीर सिंग म्हणतोय कला हा माझा धर्म
Featured

रणवीर सिंग म्हणतोय कला हा माझा धर्म

Sarvmat Digital

मुंबई- अवघं बॉलिवूड ज्या मानाच्या पुरस्काराचं स्वप्न उराशी बाळगतं, तो फिल्मफेअर पुरस्कार सोहळा यंदा गुवाहाटी इथं पार पडणार आहे. आज हा पुरस्कार पार पडणार असून यासाठी बॉलिवूडची कलाकार मंडळी गुवाहाटीत दाखल झाली आहेत. अभिनेता रणवीर सिंग देखील या सोहळ्यासाठी तिथं दाखल झालाय. या सोहळ्याच्या रंगीत तालीम सुरू आहे.

या दरम्यानचा एक फोटो शेअर करत रणवीरनं गली बॉय चित्रपटाचा एक डॉयलॉग कॅप्शनमध्ये लिहिला आहे. फिल्मफेअरच्या भव्य-दिव्य स्टेजवर मधोमध रणवीर उभा आहे…असा हा फोटो आहे. कलाकार मैं, कल को आकार दूँ, यही है मेरा धर्म, मेरी दूसरी कोई जात नाफ (कलाकार मी, उद्याला आकार देईन… हाच माझा धर्म, माझी दुसरी कोणती जात नाही), असं कॅप्शन रणवीरनं दिलं आहे. त्याचा एक विशेष डान्स या सोहळ्यात असणार आहे. त्याचा उत्साह हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. या सोहळ्यातही त्याचा हाच अंदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com