‘नाइट लाइफ’चं काय होईल ते वेळच ठरवेल : नेहा पेंडसे
Featured

‘नाइट लाइफ’चं काय होईल ते वेळच ठरवेल : नेहा पेंडसे

Sarvmat Digital

मुंबई- नाइट लाइफ हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मराठी इंडस्ट्रीतली नामवंत अभिनेत्री नेहा पेंडसेनं यावर आपलं मत मांडलं आहे. रात्र जीवन ही संकल्पना आपल्याकडे नवीन आहे. त्याचे फायदे-तोटे समोर येतीलच, तोवर त्याचं स्वागत तर करू, असं ती म्हणते. मुळात नाइट लाइफ ही संकल्पना आपल्याकडे फार उशीरा आली.

माझ्या मते, मुंबईत नाइट लाइफचा फायदा वीकेंडसना अधिक होईल. कारण मुंबईतील आयुष्य धावपळीचं आणि तणावाचं आहे. दिवसभर राबराब राबल्यानंतर रात्री आनंद लुटण्यासाठी गेल्यावर दुसर्‍या दिवशी कामावर कसं जाणार, हा प्रश्न उरतो. त्यामुळे लो वीकेंडला बाहेर जाऊन एन्जॉय करु शकतात. तसंच आपल्याकडची मानसिकताही वेगळी आहे. दिवसभर मेहनत घेतल्यानंतर रात्री घरी जाऊन आराम करण्यास प्राधान्य दिलं जातं. कारण आपण दिवसभर मनावर एवढा ताण घेऊन वावरत असतो की कधी एकदा घर गाठतोय असं होतं.

Deshdoot
www.deshdoot.com