एक्स-बॉयफ्रेंन्डवर नेहा भडकली

एक्स-बॉयफ्रेंन्डवर नेहा भडकली

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका नेहा कक्कड तिच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली दोघेजण काही दिवसांपूर्वी एकमेकांच्या प्रेमात होते पण काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला.

यातून नेहा सावरली नाही तोपर्यतच हिमांशने तिच्यावर आरोप करायला सुरूवात केली. यानंतर मात्र नेहा हिमांशवर खूपच भडकली आहे. या आरोपामुळे नेहाने सोशल मीडियावरून हिमांशला इशाराच केला आहे.

यामध्ये तिने माझ्या आणि माझ्या कुटुंबापासून दूर राहा असे सांगितले आहे. तसेच नेहाने एक पोस्ट करून लिहिले आहे की, जे लोक वाईट बोलतात. ते माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाहीत. ते खोटारडे आणि माझ्यावर जळणारे आहेत.

चर्चेत राहण्यासाठी हे लोक माझ्या नावाचा वापर करतात. यापूर्वीही असे झाले आणि आता माझ्या मागून माझ्या नावाचा वापर त्यांनी चालवला आहे. स्वत: काम करा आणि प्रसिद्धी मिळवा. माझ्या नावाचा वापर करू नका. मी तोंड उघडले तर तुझी आई, बाबा आणि बहीण सर्वांचे खरे चेहरे जगाच्या समोर येतील.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com