बेशिस्त वाहनचालकांवर ऑनलाईन दंडाची कारवाई
Featured

बेशिस्त वाहनचालकांवर ऑनलाईन दंडाची कारवाई

Sarvmat Digital

सुपा (वार्ताहर) – महामार्गावर अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने नजर ठेवली जात असून, या माध्यमातून वेगमर्यादा ओलाडणे, मद्यपान करून वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे या सारख्या गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी ऑनलाईन दंड ठोठावले जात आहेत.

महाराष्ट्रातील सर्वच महामार्गावर बेकायदेशीर रित्या वाहन चालविणे, वेग मर्यादा न पाळणे, नशेत वाहन चालविणे, दुचाकी चालविताना हेल्मेट न वापरणे असे प्रकार सर्रास चालतात. त्याला आळा बसवण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून स्पिडगण मशिनद्वारे वाहनांवर नजर ठेवली जात आहे. त्यात साधारणपणे कार प्रकारातील वाहनांसाठी ताशी 90 किमी, बससाठी 80 किमी तर दुचाकीसाठी 70 किमी वेग मर्यादा शासनाने निश्चित केली आहे. या वेगाची मर्यादा स्पिडगणच्या स्क्रिनवर दिसते. तसेच त्या गाडीचा नंबर पण मशिनच्या स्क्रीनवर नोंदवला जातो. त्यामुळे वेगमर्यादा तोडल्यास ताबडतोब वाहन मालकाला मेसेज करून निर्धारीत दंड केल्याची माहिती दिली जाते.

स्पिडगणच्या स्क्रिनवर एक किलोमीटर दुरच्या गाडीचा वेग, त्याचे बेशिस्त चालने कळते. चालकाचे वाहन चालवणे बेशिस्त वाटल्यास ताबडतोब वाहन थांबून चालकाची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनच्या सहाय्याने तपासणी करून मद्य प्राशन केले की नाही, हे पाहिले जाते. चालक नशेत आढळल्यास वाहन व चालकाला ताब्यात घेऊन आँनलाईन दंड आकारला जातो. पोलिस प्रशासनाच्या या कारवाईचे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.

अत्याधुनिक स्पिडगण मशिनद्वारे वाहनाची वेग मर्यादा कळते व नियम मोडल्यास तात्काळ दंड आकारला जातो. महामार्गावर स्पिडगणची गाडी दिसल्यास वाहन चालक शिस्तीत वाहन चालवतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन वाहन चालकांना शिस्त लागत आहे.
– शशिकांत गिरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक.

Deshdoot
www.deshdoot.com