अतिवृष्टी आणि पूरबाधितांना पीककर्ज माफी
Featured

अतिवृष्टी आणि पूरबाधितांना पीककर्ज माफी

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सर्व शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक सहकार विभागाने काल जारी केले आहे. या निर्णयामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, कापूस, ऊस पिकांचे नुकसान झालेल्या नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या आपदग्रस्तांना मदतीचे निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे बैठक 19 ऑगस्ट 2019 रोजी पार पडली होती.

Deshdoot
www.deshdoot.com