अमेरिकेत एच-१बी व्हिसा देणे बंद करण्याच्या हालचाली !
Featured

अमेरिकेत एच-१बी व्हिसा देणे बंद करण्याच्या हालचाली !

Sarvmat Digital

दिल्ली – करोनामुळे अमेरिकेत सध्या बेरोजगारांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने एच-1बी व्हिसा देणे बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेत नोकरी करणार्‍या भारतीयांना याचा मोठा फटका बसणार आहे.

गैरप्रवासी व्हिसा असलेल्या एच-1बी अंतर्गत अमेरिकी कंपन्या परदेशी कर्मचार्‍यांची नेमणूक करतात. भारतात प्रामुख्याने आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये याची विशेष लोकप्रियता आहे. या व्हिसाच्या आधारे सध्या अमेरिकेत सुमारे पाच लाखांहून जास्त परदेशी नागरिक नोकरी करत आहेत. मात्र, ट्रम्प प्रशान इमिग्रेशन सल्लागार यासंदर्भात सध्या योजना तयार करत असून, यानुसार तांत्रिकदृष्या कुशल असणार्‍यांसाठी एच-1बी, ठरावीक कालावधीसाठी काम करणार्‍यांना देण्यात येणार्‍या एच-2बी आणि विद्यार्थी व्हिसावर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com