Saturday, May 4, 2024
Homeनगरगुहाजवळ बिअरची वाहतूक करणारा टेम्पो उलटला

गुहाजवळ बिअरची वाहतूक करणारा टेम्पो उलटला

नगर-मनमाड महामार्गावर बिअरच्या बाटल्यांचा सडा; तळीरामांची तोबा गर्दी

राहुरी (प्रतिनिधी)- लॉकडाऊनच्या कालावधीतच दारूविक्री सुरू होऊन पुन्हा अवघ्या दोन तासांतच दुकानांना सील ठोकल्याने हिरमोड झालेल्या तळीरामांना नगर-मनमाड महामार्गावर राहुरी तालुक्यातील गुहा गावाजवळच चांगली संधी चालून आली. नगरहून मनमाडच्या दिशेने बिअरच्या भरलेल्या बाटल्या घेऊन निघालेला टेम्पो टायर फुटल्याने उलटला.

- Advertisement -

दरम्यान, त्यातील बिअरच्या बाटल्यांचे खोके महामार्गावर इतस्ततः विखुरले. महामार्गावर अक्षरशः बिअरच्या बाटल्यांचा सडा पडला. ही वार्ता वार्‍यासारखी पसरली. बिअर पळविण्यासाठी तळीरामांची तोबा गर्दी झाली. मात्र, पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी या मालाची रखवाली केल्याने तळीरामांचा हिरमोड झाला. त्यामुळे वाहनचालकाचा माल शाबूत राहिला.

मात्र, तरीही पोलीस येण्यापूर्वीच बिअरच्या बाटल्या पळविण्यात काही तळीराम यशस्वी ठरले. त्यांची चांगलीच चंगळ झाली. ही घटना काल बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या