एकही रुग्ण न आढळ्यास 10 मे नंतर जिल्हा ग्रीन झोन
Featured

एकही रुग्ण न आढळ्यास 10 मे नंतर जिल्हा ग्रीन झोन

Sarvmat Digital

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आशा

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र व राज्याच्या आदेशानुसार लॉकडाऊन तीन मे रोजी उठेल की नाही याबाबत शंका आहे. मात्र, जिल्ह्यात करोनाची विद्यमान परिस्थिती पाहता आणि नव्याने एकही करोना जिल्हा 10 मे नंतर ग्रीन झोनमध्ये येईल. मात्र नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. करोनावर अद्यापही लस निघालेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करोना विषयी व खरीब हंगामाच्या पार्श्वभूमीवर आढवा बैठक घेतली.त्यानंतर त्यांनी प्रेसशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात जामखेड, संगमनेर तालुका वगळता इतर तालुके करोनामुक्त आहे.

तसेच जिल्ह्याबाहेर अडकलेले नागरिकांना लवकरच जिल्ह्यात येता येणार आहे. मात्र, त्यांना 14 दिवस वैद्यकीय अधिकारी यांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. आतापर्यंत 1 हजार 453 अहवाला पुण्याच्या वैद्यकीय प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 43 करोना बाधित सापडले होते. त्यापैकी 25 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.तसेच यंदा हवामान विभागाच्या आंदाजानुसार मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. शेतकर्‍याना लागणारे बी-बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

भाजपच्या काळात धान्य वाटपात दुजाभाव
लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने रेशन दुकानांमधून धान्य वाटप केले आहे. भाजपच्या गेल्या पाच वर्षात रेशनचे धान्य वाटप करताना दुजाभाव करण्यात आला. फक्त 14 जिल्ह्यांनाच त्याचा लाभ मिळाला. 23 जिल्हे वंचित राहिले. राज्य सरकारचा केंद्राकडे जीएसटीमधून मिळणारा मोठा निधी थकीत आहे. तरीही राज्य सरकारने मदत करताना हात आखडता घेतला नसल्याचे मुश्रीफ म्हणाले.

कंपनीतील कामगारांना मिळणार पास
दीड महिन्यांपासून करोनाच्या संकटामुळे सर्वत्रच लॉकडाऊन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिकवसाहती बंद पडल्या आहेत. त्याचा परिणाम आर्थिक परिस्थिवर झाला आहे. जिल्हा रेडझोन मधून बाहेर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कंपन्या पुन्हा सुरु करण्यात येत आहे. आजमितीस 225 कारखाने सुरु आहेत. त्यासाठी कामगारांनाही पास देण्यात येणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com