जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 30 जून
Featured

जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 30 जून

Sarvmat Digital

दिल्ली – करोना संकटामुळे देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकारने २०१८-२०१९ या आर्थिक वर्षासाठी जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. या बाबतची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे.

व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. पाच कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांना कोणताही व्याज दर, उशीरा फी आणि जीएसटी उशिरा भरल्याबद्दल दंड आकारला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. याचबरोबर पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणार्‍या कंपन्यांना जीएसटी भरण्यास उशीर झाल्यास फी किंवा दंड आकारला जाणार नाही.

Deshdoot
www.deshdoot.com