शिवसेना पदाधिकारी हत्या प्रकरणी दोघांना अटक

शिवसेना पदाधिकारी हत्या प्रकरणी दोघांना अटक

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील शिवसेना उपतालुका प्रमुख सुरेश शामराव गिर्‍हे यांची भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील भोजडे चौकी नजीक असलेल्या गिर्‍हे वस्ती येथिल त्यांच्या घरी सहा हल्लेखोरांनी रविवार हल्ला करून हत्या केल्या प्रकरणी पसार असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

याबाबत माहिती अशी की, भोजडे चौकी येथील रहिवाशी असलेल्या सुरेश शामराव गिर्‍हे याची हत्या केल्यानंतर त्यातील आरोपी रवी आप्पासाहेब शेटे व विजय खर्डे यासह सहा आरोपी पसार होते.त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट डिझायर व एक बजाज पल्सर ही दुचाकी वापरल्याचे सिद्ध झाले आहे. पोलीस या आरोपींना शोधात होते. त्यासाठी विविध दिशांना पाच पथके रवाना केलेले आहेत. त्यात नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात तेथील नागरिकांना एक बेवारस कार आढळून आली होती. त्यांनी याबाबत आधी वैजापूर पोलिसांना व त्यानी नंतर कोपरगाव तालुका पोलिसांना कळवले होते.

ही कार ताब्यात घेण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उप पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे यांनी कार ताब्यात घेतली मात्र या कारचे दरवाजे व काचा उघड्या असल्याचे त्यांना त्यात कोणतीही हत्यारे आढळून आली नाहीत. आज बुधवार दि 18मार्च रोजी ह्या हत्येच्या गुह्यातील दोन आरोपीना पोलिसांनी पुणे शहरातून ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून त्याची चौकशी केल्यानंतर हत्येत वापरलेली हत्यारे व इतर समानाची चौकशी करून ताब्यात घेण्याचे काम पोलिसांनी केले आहे.या दोनही आरोपींना हत्येच्या ठिकाणी नेऊन तेथे फेकलेली हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याचे वृत्त समजले असून पुढील तापस पोलिस करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com