41 हजार जनावरांचे खच्चीकरण
Featured

41 हजार जनावरांचे खच्चीकरण

Sarvmat Digital

सेवाशुल्कपोटी ‘पशुसंवर्धन’कडे एक कोटी 37 हजारांच्या निधीचे संकलन

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात जनावरांच्या आरोग्याची निगा राखण्यात येते. यासाठी लसीकरण, औषधोपचार, लहान मोठ्या शस्त्रक्रिया यासह निकृष्ट जनावरांच्या पैदाशीसाठी संबंधित जनावरांचे खच्चीकरण करण्यात येते. गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील 41 हजार 264 जनावरांचे प्रत्येकी अवघ्या एक रुपयात खच्चीकरण केलेले आहे. मात्र, काही ठिकाणी शेतकर्‍यांकडून जनावरांच्या खच्चीकरणाबाबत गैरसमज असल्याने खच्चीकरण टाळण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे गेल्या वर्षभरात जिल्हाभर पशुधनाच्या विविध उपचारापोटी एक कोटी 37 हजार रुपयांचा सेवाशुल्क जमा झाला आहे. मात्र, या विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी असणारे नाममात्र एक रुपये प्रती जनावराचे सेवाशुल्क वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या वाढ केल्यास पशुसंवर्धन विभागाला मोठ्या प्रमाणात सेवाशुल्काच्या रुपाने निधी उपलब्ध होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या पशूसवंर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील दुधाळ आणि अन्य लहान-मोठ्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते. यात विशेष करून साथजन्य आजार उद्भविण्यापूर्वीच दुधाळ जनावरांचे खच्चीकरण करणे, यासह जनावरांची निकृष्ठ पैदास थांबविणे, आजारी असणार्‍या जनावरांवर उपचार करणे यासह शेतकर्‍यांनाप कृत्रिम रेतन पुरविण्यात येते. यातील बहूतांशी सुविधांसाठी पशूसंवर्धन विभाग प्रत्येकी अवघा 1 रुपया शुल्क आकाराते.

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात करण्यात येणार्‍या निधीतून जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील जनावरांवर खर्च करते. मात्र, पशूसवंर्धन विभागाने आपल्या सेवाशुल्कात वाढ केल्यास वर्षभरात संकलित होणारा 1 कोटी 37 लाखांचा सेवा शुल्क हा दुप्पट अथवा तिप्पट करता येणे शक्य आहे. तसेच मोठ्या प्रमाणात संकलित होणारा पैसा पुन्हा जिल्ह्यातील पशूधनावर खर्च करणे शक्य होणार आहे.

जिल्हा परिषदेचा पशूसंवर्धन विभागा मोठ्या जनावरांच्या शस्त्रक्रियेसाठी 50 रुपये तर, लहान जनावरांच्या शस्त्रक्रियेसाठी 10 रुपये शुल्क आकाराते, शवविच्छेदनासाठी हेच दर आहेत. तसेच लसीकर, औषध उपचार आणि बाबीसाठी प्रती जनावरे 1 रुपये शुल्क आकारण्यात येते. हा सेवा शुल्कवाढविल्यास पशूसंवर्धन विभागाकडे मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकर्‍यांना कृत्रिम रेतनासाठी 41 रुपये प्रती जनावरे आकारण्यात येत असून यातील 40 रुपये महाराष्ट्र पशूधन विकास महामंडळाला देण्यात येत असून यात देखील जिल्हा परिषदेला 1 रुपया मिळत आहे.

वर्षभर राबविलेले उपक्रम
20 हजार 482 विदेशी, देशी 20 हजार 373 आणि म्हैस 24 हजार 402 कृत्रिम रेतन पुरवठा. 11 लाख 72 हजार जनांवरांवर उपचार, 35 हजार 212 लहान शस्त्रक्रिया तर 1 हजार 941 लहान शस्त्रक्रिया, 41 हजार 264 जनावरांचे खच्चीकरण, 41 हजार 842 अंडी उत्पादन, 27 हजार 845 कांबड्याचे लसीकरण, 11 हजार 399 कोेंबड्यांच्या रोगनिदानासाठी तपासलेले नमुने, जनावरांचे 872 वांधत्व निवारण शिबिरे यांचा समावेश आहे.

सोमवारी पशूसंवर्धन विभागाची पहिली बैठक आहे. या बैठकीत जिल्ह्यातील पूशधनाला आणखी दर्जेदार आरोग्य सेवा देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे पशूसंवर्धन विभागाच्या सेवाशुल्क वाढीसाठी काय करता येईल, यासाठी प्रयत्न करणार.
-सुनील गडाख, सभापती अर्थ आणि पशूसंवर्धन समिती, जिल्हा परिषद. 

Deshdoot
www.deshdoot.com