खोट्या सोन्यावर लाखो रुपयांचे कर्ज वाटप
Featured

खोट्या सोन्यावर लाखो रुपयांचे कर्ज वाटप

Sarvmat Digital

सोनगाव शाखेतील सोने तारण व्यवहार संशयास्पद

राहुरी (प्रतिनिधी)-  राज्यात,सहकार क्षेत्रातील एक अग्रणी बँक अशी ओळख असलेल्या जिल्हा स्तरीय सहकारी बँकेत खोट्याफ सोन्यावर लाखो रुपयांचे कर्जाचे वाटप झाल्याने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सोने खरे की खोटे याची तपासणी करण्यासाठी बँकेने नेमलेला अधिकृत सराफ आणि खोट्या सोन्याच्या दागिन्यांचा पुरवठा करणारे एजंट यांच्या संगनमताने बँकेच्या सोनगाव या शाखेत हा करण्यात आला असल्याचे समजते. मागील चार-पाच वर्षापासून सुरु असलेल्या या गंभीर घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बँका,पतसंस्था यांचेकडून सोने तारणावर कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध आहे. जिल्हा सहकारी बँकेकडून 11 टक्के व्याज दराने एक वर्षे मुदतीचे सोन्यावर कर्ज वितरीत केले जाते. कर्ज वितरण करतांना,ग्राहकाने दिलेले सोने खरं की खोट याची तपासणी करण्यासाठी बँके तर्फे अधिकृत सराफाची नेमणूक केली जाते. ग्राहकाने दिलेले सोनं शंभर टक्के खरफ आहे असे लेखी सर्टिफिकेट सराफ देत नाही तो पर्यंत बँकेकडून कर्ज मंजूर केले जात नाही अशी बँकच्या कामाची पद्धत.

मात्र जिल्हा बँकेच्या सोनगावफ शाखेत सराफ आणि एजंट यांनी संगनमताने धुमाकूळ घातला. सराफाला हाताशी धरून सोनगाव येथील रहिवाशी असलेला भाऊसाहेबफ नावाच्या एका एजंटाने बाजारातून किमान एक क्विंटल नकली सोने बनवून ते आपल्या घरी आणून ठेवले. सोनगाव ,सात्रळ,धानोरे या बाजार पेठेच्या गावातील गरजूंना हेरत असे. माझ्याकडे असलेले सोने तुम्हाला देतो त्यावर बँकेकडून सोने तारण कर्ज मंजूर करून देतो. मंजूर कर्जापैकी काही रक्कम तुम्हाला फुकट देतो उर्वरित मला द्या असे आमिष दाखवून या एजंटाने किमान 200 हून अधिक जणांच्या नावे खोटे सोने तारण ठेऊन बँके कडून लाखो रुपयांचे कर्ज मंजूर घेतले.

हा एजंट मिळालेली रक्कम 10 टक्के व्याजाने कर्जरूपाने इतरांना देत असे. बँकेचे कर्ज मंजूर करण्यासाठी भाऊसाहेबफ हा एजंट सराफाकडून सोने खर आहे असे सर्टिफिकेट मिळवत आहे आणि ते देतांना हा सराफही कुठलीही शहानिशा न करता देत असे. अशा पद्धतीने एजंटाने सराफाला हाताशी धरून खोट्या सोन्यावर लाखो रुपयांचे कर्ज बँकेकडून उकळले. या बँकेत अशा पद्धतीने मोठा घोटाळा झाला असल्याचे समजते.

बँकेतील सोने तारण कर्ज व्यवहाराच्या संशयास्पद प्रकरणी बोलतांना धानोरे येथील सेवा सोसायटी चे चेअरमन किरण दिघे म्हणाले, या बँकेच्या सोने तारण कर्ज व्यवहाराची उलट सुलट चर्चा सुरु आहे. बँक प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषीवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली. बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी मात्र बोलण्यास नकार देत 18 मार्च रोजी थकबाकीदार कर्जदारांचा सोने लिलाव होणार असून त्यावेळी त्यातून खरे सत्य बाहेर येईल त्यानंतर काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ असे सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com