‘..तर उड्डाणपुलासाठी भूमिका घ्यावी लागेल’
Featured

‘..तर उड्डाणपुलासाठी भूमिका घ्यावी लागेल’

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या काही महिन्यांपासून उड्डाणपुलाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे. येत्या अधिवेशनात उड्डाणपुलाबाबत शेवटचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, नगरचा उड्डाणपूल कोणत्याही परिस्थितीत करणारच. त्यासाठी मला वेगळी भूमिका घ्यायची गरज असल्यास ती घेणारच असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात खा. विखे हे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, उड्डाणपुलाच्या कामात काही लष्कराची जागा येत आहे. त्यासाठी लष्कराच्या अधिकार्‍यांसोबतदेखील चर्चा झाली आहे. तेही काम अंतिम टप्प्यात आहे. प्रत्यक्षात 95% भूसंपादन झाले आहे. तरीदेखील काम सुरू होत नाही. त्यामुळे येत्या अधिवेशनात मी उड्डाणपुलाचा प्रश्न उपस्थित करणार आहे. त्यासाठी मला वेगळी भूमिका घ्यावयाची गरज पडल्यास ती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com