नेवासा – घोडेगाव येथे कापड दुकानाला आग
Featured

नेवासा – घोडेगाव येथे कापड दुकानाला आग

Sarvmat Digital

गणेशवाडी (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील भक्ती कलेक्शन या कापड दुकानाला आग लागुन सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

समजलेल्या माहिती नुसार घोडेगाव येथील मार्केट कमिटी जवळ भक्ती कलेक्शन नावाने झापवाडी येथील तुकाराम जरे यांचे कापड दुकान आहे. लाँकडाऊन असल्याने दुकान बंद होते. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता दुकान उघडल्यानंतर दुकानात आग लागली असल्याचे लक्षात आल्याने बाजूच्या लोकांच्या मदतीने पाणी टाकून ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने आजुबाजूच्या दुकानांना याची कुठल्याही प्रकारची हानी पोहचली नाही. ही आग विजेच्या शाँर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते .या आगीमध्ये अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तुकाराम जरे यांनी सांगितले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com