Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरशेतकरी सन्मान योजनेतील 120 कोटींचा निधी प्राप्त

शेतकरी सन्मान योजनेतील 120 कोटींचा निधी प्राप्त

‘जनधन’चा 4 लाख 38 खात्यांवर 22 कोटींचा निधी वर्ग

अहमदनगर (प्रतिनिधी)- जनधन योजनेंतर्गत जिल्ह्यातील 4 लाख 38 हजार बॅँक खातेदारांच्या खात्यावर 21 कोटी 90 लाख रुपये जमा झाल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याशिवाय शेतकरी सन्मान योजनेतील 6 लाख 9 हजार 141 शेतकर्‍यांना प्रत्येकी दोेन हजार या प्रमाणे 120 कोटी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून लवकरच ते शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होतील असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

- Advertisement -

मुश्रीफ म्हणाले, महात्मा फुले शेतकरी सन्मान योजने अंतर्गत नगर जिल्ह्यातील 3 लाख 43 हजार शेतकर्‍यांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यात 2 लाख 53 हजार 455 जणांची नावे निश्चित करण्यात आलेली आहे. आता 6 हजार 230 शेतकरी पात्र होण्याचे राहिले आहेत. त्यांची सुद्धा लवकरात लवकर माहिती घेतली जाईल. या योजनेकरिता नगर जिल्ह्याला 1 हजार 463 कोटी रुपये जमा झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

घरात बसनेच औषध
कोरोनावर आजतरी कोणतेही औषध नसून घरात बसणे हे एकच औषध आहे, असे सांगत पालकमंत्री मुश्रीफ यांनी नगरकरांना घरात बसण्याचे आवाहन केले.

आशा स्वयंसेविकांना हजार रुपये अतिरिक्त
ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कर्मचारी तसेच आशा वर्कर काम करीत आहेत. त्यांना एक हजार रुपये अतिरिक्त मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना पंचवीस लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जे या काळामध्ये काम करत आहेत, त्यांना सर्वांना सहकार्य करण्याची शासनाची भूमिका राहणार असल्याचेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या