वीजेच्या धक्क्याने मामा-भाचीचा मृत्यू
Featured

वीजेच्या धक्क्याने मामा-भाचीचा मृत्यू

Sarvmat Digital

तुटलेल्या तारेमुळे घडला प्रकार

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील जवळे येथे वीजवाहक तारेचा धक्का बसून तरुणासह अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 18) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. सुभाष सोमनाथ जाधव (वय- 35), सोनाली कैलास देशमुख (वय- 17) अशी मयतांची नावे आहेत. मयत दोघे मामा-भाची आहेत.

जवळे येथील बालके वस्तीपासून जवळच असणार्‍या सिद्धेश्वर ओढ्यावर मंगळवारी रात्री आठच्या नंतर खेकडे पकडण्यासाठी सुभाष जाधव व सोनाली देशमुख हे दोघे मामा-भाची लहान मुले घेऊन चालले होते. एका ओढ्यातून ते जात असताना वीजपुरवठा करणारी मुख्य तार तुटल्याने पाण्यात वीज प्रवाह होता. परिसरात अंधार असल्याने वीजेची तार पाण्यात पडली असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.

यामुळे चिकटून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना बरोबर असणार्‍या मुलांनी पहिली. त्यांनी शेजारी असलेल्या सालके वस्तीवरील ग्रामस्थांना माहिती दिली. तार तुटल्याची कल्पना चार दिवसांपूर्वी महावितरणला सालके वस्तीवरील ग्रामस्थांनी दिली होती. परंतु तार दुरुस्ती वेळेवर झाली नसल्याने या दोघांना जीव गमावला लागला. निघोज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अशोक निकम, रवींद्र पाचारने, यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.

Deshdoot
www.deshdoot.com